मुंबई : महिंद्रानं आपल्या लोकप्रिय एक्सयूव्ही 500 कारचं पेट्रोल व्हेरिएंट नुकतंच लाँच केलं आहे. या कारची किंमत 15.49 लाख (एक्स शोरुम किंमत) आहे. या कारची स्पर्धा जीप कंपासशी असणार आहे.



महिंद्रा एक्सयूव्ही 500 पेट्रोलमध्ये 2.2 लीटर इंजिन देण्यात आलं आहे. ज्याची 140 पीएस पॉवर आणि 320 एनएम टॉर्क आहे. यामध्ये 6 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देण्यात आला आहे.

एक्सयूव्ही 500 जी एटीमध्ये अँड्रॉई़ड ऑटो सपोर्ट 7.0 टचस्क्रिन इंफोटेन्मेंट सिस्टम, 8 पद्धतीनं पॉवर अॅडजस्ट होणारी ड्रायव्हर सीट, ड्यूल एअरबॅग, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम, पॅसिव्ह की लेस एंट्री आणि पुश बटन स्टार्ट-स्टॉपसह अनेक खास फीचरही देण्यात आले आहेत.

बातमी सौजन्य : cardekho.com