मुंबई: LG ने नुकतेच दोन नवे स्मार्टफोन लाँच केले आहेत. LG G6+ 128 जीबी आहे तर दुसरा स्मार्टफोन LG G6  32 जीबी आहे.


LG G6  हा स्मार्टफोन एलजीनं आपल्या युनाइटेड किंगडममधील वेबसाइटवर लिस्ट केला आला आहे. तर LG G6+ दक्षिण कोरियात लाँच करण्यात आला आहे. दरम्यान, हे स्मार्टफोन कधीपासून खरेदी करता येणार याबाबत कंपनीनं कोणतीही माहिती दिलेली नाही.

एलजी जी6 मध्ये 32 जीबी मेमरी असणार आहे. तर एलजी जी6 प्लसमध्ये 128 जीबी स्टोरेज असणार आहे. तसेच यामध्ये वायरलेस चार्जिंगही असणार आहे. तसंच यात क्वॉड-डीएसी फीचरही मिळणार आहे.

या मॉडेलसह नवे कलर व्हेरिएंट देखील लाँच करण्यात आले आहेत.

LG G6+ स्मार्टफोनचे खास फीचर:

यामध्ये 5.70 इंच डिस्प्ले असून

डिस्प्ले रेझ्युलेशन 1440x2880 पिक्सल

128 जीबी इंटरनल मेमरी

4 जीबी रॅम

अँड्रॉईड नॉगट 7.0

13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा, 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा

बॅटरी 3300 mAh