मुंबई : प्रसिद्ध स्मार्टफोन मेकर कंपनी लेनोव्होने भारतात आपला नवा स्मार्टफोन ‘झेड 2 प्लस’ लॉन्च केला आहे. अमेझॉन इंडिया या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवर एक्स्क्लुझिव्हली या स्मार्टफोनची विक्री सुरु करण्यात येणार आहे.


लेनोव्हो झेड 2 प्लस स्मार्टफोनची विक्री 25 सप्टेंबरला रात्री 11 वाजून 59 मिनिटांनी अमेझॉनवर सुरु होणार आहे. लेनोव्होचा हा फ्लॅगशिप स्मार्टफोन ब्लॅक आणि व्हाईट कलरमध्ये उपलब्ध असेल.

लेनोव्हो झेड 2 प्लसचे फीचर्स :

  • 5 इंचाचा पूर्ण एचडी आयपीएस एलसीडी डिस्प्ले (1920×1080 पिक्सेल)

  • 2.15 गीगाहर्ट्झ क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसर

  • 3 जीबी रॅम 32 जीबी इनबिल्ट स्टोरेज (पहिला व्हेरिएंट)

  • 4 जीबी रॅम 64 जीबी इनबिल्ट स्टोरेज (दुसरा व्हेरिएंट)

  • ग्राफिक्ससाठी एड्रेना 530 जीपीयू इंटिग्रेटेड

  • 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा

  • 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा

  • रिअर कॅमेऱ्यामध्ये फेस डिटेक्शन, पॅनोरमा मोज, इंटेलिजेंट HDR, स्लो मोशन, व्हिडीओ रेकॉर्डिंग फीचर्स

  • फिंगरप्रिंट सेन्सर

  • 3500 एमएएच क्षमतेची बॅटरी

  • 4 जी एलटीई

  • वाय-फाय 11 ए/बी/जी/एन/एसी

  • ब्लूटूथ 1

  • यूएसबी टाइप-सी पोर्ट


 

किंमत :

  • 3 जीबी रॅम 32 जीबी इनबिल्ट स्टोरेज (पहिला व्हेरिएंट) – 17,999 रुपये

  • 4 जीबी रॅम 64 जीबी इनबिल्ट स्टोरेज (दुसरा व्हेरिएंट) – 19,999 रुपये


 

कॅमेरा आणि फीचर्स :

  • 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा

  • 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा

  • 4 के व्हिडो रेकॉर्डिंग

  • स्लो मोशन

  • टाईम लॅप्स


 

या स्मार्टफोनमध्ये 3500 एमएएच क्षमतेची बॅटरी असून, फिंगरप्रिंट सेन्सरही दिलं आहे.