व्हॉट्सअॅपला तगडा स्पर्धक, गुगलचं अॅलो अॅप लाँच
एबीपी माझा वेब टीम | 21 Sep 2016 10:05 PM (IST)
नवी दिल्लीः व्हॉट्सअॅपला आता तगडा मेसेंजर स्पर्धक मिळाला आहे. गुगलकडून अॅलो या अॅपचं अनावरण करण्यात आलं आहे. हे अॅप सध्या गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. मेसेंजर अॅप व्हॉट्सअॅपला या निमित्ताने मोठा स्पर्धक मिळाला आहे. अॅलो अॅपबद्दल अनेक दिवसांपासून वेगवेगळी माहिती समोर येत होती. अखेर गुगलने याचा एक व्हिडिओ शेअर करत हे अॅप लाँच केलं आहे. व्हॉट्सअॅपप्रमाणेच या अॅपमध्ये आकर्षक फीचर्स देण्यात आले आहेत. एचडी व्हिडिओ क्वालिटी, व्हिडिओ कॉलिंग, फोटो शेअर आणि चॅटिंगसह व्हॉट्सअॅपप्रमाणेच फीचर्स या अॅपमध्ये देण्यात आले आहेत. युझर्स या अॅपला कशी पसंती देतात, ते पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. पाहा फीचर्सः