- अँड्रॉईड 5.0 लॉलिपॉप ऑपरेटिंग सिस्टम
- 5 इंचाचा एचडी (1080x1920) डिस्प्ले
- ड्युअल फ्रंट कॅमेरा
- 13 मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा
- 8 मेगापिक्सेल आणि 2 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
- 132 ग्रॅम वजन
- 64-बिट क्वाड-कोर मीडियाटेक प्रोसेसर
- 3 जीबी रॅम
- इनबिल्ट स्टोरेज 32 जीबी
- मायक्रो एसडी कार्डच्या सहाय्याने 128 जीबीपर्यंत स्टोरेज वाढवण्याची सुविधा
- 4G LTE कनेक्टिव्हिटी
- 2500 एमएएच बॅटरी क्षमता
लेनोवोच्या ‘वाईब एस-1’ स्मार्टफोनच्या किंमतीत मोठी कपात
एबीपी माझा वेब टीम | 25 Apr 2016 02:29 PM (IST)
मुंबई : लेनोवो वाईब एस वन स्मार्टफोनच्या किंमतीत मोठी कपात करण्यात आली आहे. आता हा स्मार्टफोन 12 हजार 999 रुपयांमध्ये मिळणार आहे. लेनोवो इंडियाने एका ट्विटच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली. ई-कॉमर्स वेबसाईट अमेझॉनवर नव्या किंमतीसह हा स्मार्टफोन ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. https://twitter.com/Lenovo_in/status/724521143000915968 गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात लेनोवो वाईब एस-1 स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला होता. लॉन्चिंगवेळी या स्मार्टफोनची किंमत 15 हजार 999 रुपये होती. लेनोवो वाईब एस-1 स्मार्टफोनचे फीचर्स: