मुंबई : प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी लेनोव्होनं आपला P2 हा स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनचे दोन व्हेरीएंट ग्राहकांसाठी उपलब्ध असतील. फ्लिपकार्टवर या स्मार्टफोनची विक्री सुरु झाली आहे.
फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या या स्मार्टफोनची किंमत 16999 ते 17999 असेल. आपला जुना स्मार्टफोन एक्सचेंज केल्यास त्यावर 2000 पर्यंत सूटही देण्यात येईल. एसबीआय ग्राहकांसाठी विशेष ऑफर्सही देण्यात आल्या आहेत.
फास्ट चार्जिंगची सुविधा असलेला हा फोन IFA2016 मध्येच लॉन्च करण्यात आला होता. मात्र भारतात तो कालपासून उपलब्ध झाला आहे.
लेनोव्हो P2 चे फिचर्स :
ऑपरेटिंग सीस्टिम : अँड्रॉईड मार्शमेलो 6.0
प्रोसेसर : 2GHz स्नॅपड्रॅगन 625 चिपसेट प्रोसेसर
रॅम : 3जीबी/4जीबी
डिस्प्ले : 5.5 इंच फूल एचडी स्क्रीन
मेमरी : 32 जीबी
कॅमेरा : 13 मेगापिक्सेल रिअर आणि 5 मेगापिक्सल फ्रंट
बॅटरी : 5100mAh
कलर व्हेरिएंट : शँपेन गोल्ड आणि ग्रॅफाईट ग्रॅफाईट