मुंबई : लॅपटॉपसाठी लोकप्रिय असणाऱ्या लेनोवो कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी एक स्मार्टफोन-टॅब्लेट (फॅबलेट) लॉन्च केला आहे. हा फॅबलेट फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

लेनोवो कंपनीने या स्मार्टफोन-टॅबमध्ये अनेक आकर्षक फीचर्स दिले आहेत. 11 हजार 999 रुपयांना असणाऱ्या हा फॅबलेट 10 ते 12 हजार रुपयांच्या दरम्यान किंमती असणाऱ्या टॅब्लेटना मोठी टक्कर देणार आहे.

 

फीचर्स:
- 6.98 इंचाचा एचडी आयपीएस डिस्प्ले
- अँड्रॉईड लॉलिपॉप 5.1
- 2 जीबी रॅम
- 16 जीबी इनबिल्च स्टोरेज
- एसडी कार्डच्या सहाय्याने स्टोरेज 64 जीबीपर्यंत वाढवण्याची सुविधा
- 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेराट
- 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
- 4G LTE सपोर्ट
- ब्लूटूथ
- वाय-फाय
- जीपीएस
- रेडिओ
- मायक्रो यूएसबी


 

या फॅबलेटचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे 4250 mAh बॅटरी क्षमता. 24 तासांचं टॉकटाईम आणि 20 दिवसांचं स्टँडबाय या फॅबलेटची बॅटरी देते, असा दावा लेनोवो कंपनी करते.