‘लेनोवो K5 नोट’ स्मार्टफोनच्या लॉन्चिंगचा मुहूर्त ठरला!
एबीपी माझा वेब टीम | 20 Jul 2016 11:07 AM (IST)
मुंबई : लेनोवोचा अपकमिंग स्मार्टफोन K5 नोट चीनमध्ये लॉन्च केल्यानंतर आता भारतात लॉन्चिंगचीही तयारी सुरु झाली आहे. कंपनीने स्मार्टफोनचा भारतातील टीझर रिलीज केला आहे. हा स्मार्टफोन 20 जूनला लॉन्च होणार होता, मात्र आता कंपनीच्या टीझरनुसार स्मार्टफोन 1 ऑगस्टला लॉन्च करणार आहे. चीनमध्ये हा स्मार्टफोन 1,099 युआनला लॉन्च केला होता. भारतात या स्मार्टफोनची किंमत 12 हजार रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनमध्ये 5.5 इंचाच डिस्प्ले असून, 1920×1080 पिक्सेल रिझॉल्युशन आहे. 1.8GHz मीडियाटेक हेलियो P10 ऑक्टाकोर प्रोसेसर असून, 2 जीबी रॅम देण्यात आला आहे. स्मार्टफोनची इंटरनल मेमरी 16 आहे, तर मायक्रो एसडी कार्डच्या सहाय्याने मेमरी वाढवण्याचीही सुविधा उपलब्ध आहे. फोटोग्राफीबाबत बोलायचं झाल्यास स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा आहे. डॉल्बी अटमॉस असणारा 1.5W स्पिकर यामध्ये देण्यात आला आहे. K5 नोटमध्ये 3500 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. शिवाय, मेटल बॉडी देण्यात आली आहे. कनेक्टिव्हिटीमध्ये 4G LTE, वायफाय, ब्लूटूथ, VoLTE, जीपीएससारखे ऑप्शन देण्यात आले असून, नवा स्मार्टफोन 6.0 मार्शमॅलो ऑपरेटिंग सिस्टमवर चालणार आहे.