मुंबई: मोबाइल कंपनी लावानं काल (गुरुवार) आपला पहिला नोटबुक 'हेलियम 14' लाँच केला आहे. या नोटबुकसाठी कंपनीनं मायक्रोसॉफ्ट औरचिप निर्माता इंटेलसोबत भागीदारी केली आहे. कारण की, ग्राहकांना युजर फ्रेंडली अनुभव मिळावा.

लावाचे प्रोडक्ट हेड गौरव निगम म्हणाले की, 'हेलियम 14 स्मार्ट उद्योजक, तरुण, आणि विद्यार्थ्यांना वापरता येणारं एक हँण्डी डिव्हाइस आहे.'

या नोटबुकमध्ये इंटेल 'एटम' प्रोसेसरसह हेलियम 14 मध्ये 14.1 इंच फुल एचडी डिस्प्ले आणि 2 मेगापिक्सल कॅमेरा आहे. या नोटबुकमध्ये 32 जीबी इंटरनल मेमरी स्टोरेज आहे. तसेच एसडी कार्डच्या मदतीनं 128 जीबीपर्यंत मेमरी वाढवता येणार आहे.

याचं वजन 1.4 किलो आहे. हा नोटबुक विंडोज 10 या प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. यामध्ये 10,000 mAh बॅटरी आहे.

लावा हेलियम 14ची किंमत 14,999 रुपये आहे. हा नोटबुक फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे.