मुंबई : नोकियाचा बहुप्रतीक्षित नोकिया 8 स्मार्टफोन अखेर आज (मंगळवार) लाँच करण्यात आला. या स्मार्टफोनची किंमत 36,999 रुपये आहे. हा कंपनीचा पहिला हाय-एंड स्मार्टफोन आहे. ज्यामध्ये  ZEISS लेस ड्यूल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 14 ऑक्टोबरपासून ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. वन प्लस 5 या स्मार्टफोनशी नोकिया 8ची स्पर्धा असणार आहे.


नोकिया 8 मध्ये 5.3 इंच स्क्रीन आहे. तसेच 2K LCD IPS डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये स्नॅपड्रॅगन 835 प्रोसेसर चिप देण्यात आली आहे. तसेच यामध्ये 4 जीबी रॅमही देण्यात आली आहे. तर याची इंटरनल मेमरी 64 जीबी असून एसडी कार्डनं मेमरी वाढवता येऊ शकते. या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉईड 7.1 नॉगट ऑपरेटिंग सिस्टम आहे.

या स्मार्टफोनची खासियत म्हणजे याचा ड्यूल रिअर कॅमेरा. याचे दोन्ही रिअर कॅमेरे हे 13 मेगापिक्सलचे असणार आहे. यामध्ये बोथीज मोड हे खास फीचरही देण्यात आलं आहे. त्यामुळे रिअर आणि फ्रंट अशा दोन्ही कॅमेऱ्यांमधून एकाच वेळी फोटो काढता येणार आहे.

यामध्ये 3090 mAh बॅटरी असून यात फास्ट चार्जिंग हे फीचरही आहे.