मुंबई : प्रीपेड वॉलेट ग्राहकांसाठी ई-केवायसी करण्याची मर्यादा 28 फेब्रुवारीनंतर वाढवण्यात येणार नाही, असं  रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्पष्ट केलं आहे. ज्या ग्राहकांच्या वॉलेटमध्ये पैसे आहेत, त्यांना चिंता करण्याची गरज नाही, असंही रिझर्व्ह बँकेने सांगितलं आहे.


ई-केवायसीचे नियम पूर्ण करुन पैसे टाकता येतील, असं रिझर्व्ह बँकेने सांगितलं.

ई-केवायसी म्हणजे काय?

KYC (Know your customer) म्हणजे ग्राहकांना आपल्या ओळखीची पडताळणी करावी लागते. यासाठी बँका ग्राहकांकडून एक फॉर्म भरुन घेतात. ज्यामध्ये ग्राहकांची जन्म तारीख, पत्ता यांची पडताळणी केली जाते, जेणेकरुन गरज पडल्यास ग्राहकाशी संपर्क करता येईल.

रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार ई-केवायसी करणं अनिवार्य आहे. ई-केवायसीचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे काही गैरप्रकार घडल्यास गुन्हेगारांपर्यंत पोहोचता येऊ शकतं. बँकांसाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य होती, मात्र मोबाईल अॅप्सचा वापर वाढल्यामुळे आता यासाठीही ही प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली.