साडेचार लाख लोकांचं चक्क व्हॉईस असिस्टंटलाच लग्नाचं प्रपोजल
एबीपी माझा वेब टीम | 18 Apr 2018 02:16 PM (IST)
स्मार्टफोनच्या युगात प्रपोजलचेही अनोखे फंडे तरुणाई शोधताना दिसत आहे. आता मात्र तब्बल साडेचार लाख लोकांनी मोबाईलमधील व्हॉईस असिस्टंटलाच लग्नाचं प्रपोजल दिलं आहे.
मुंबई : स्मार्टफोनच्या युगात प्रपोजलचेही अनोखे फंडे तरुणाई शोधताना दिसत आहे. आता मात्र तब्बल साडेचार लाख लोकांनी मोबाईलमधील व्हॉईस असिस्टंटलाच लग्नाचं प्रपोजल दिलं आहे. अँड्रॉईड स्मार्टफोनच्या युजर्सनी गुगल असिस्टंटला लग्नाचं प्रपोजल दिलं आहे, तर आयफोन वापरकर्त्यांनी मोबाईलमधील सिरीलाच लग्नासाठी मागणी घातली आहे. गुगलचे उत्पादन व्यवस्थापक ऋषी चंद्रा यांनी ही माहिती दिली. मोबाईलमधील व्हॉईस असिस्टंट हा विविध पद्धतीने आपल्याला मदत करत असतो. मात्र त्याचा असाही वापर लग्नाच्या प्रपोजलसाठीही करण्यात आला आहे.