मुंबई : देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वातील युती सरकारला सत्तेत येऊन नुकतेच दोन वर्षे पूर्ण झाले आहेत. 31 ऑक्टोबरला युती सरकारने दोन वर्षे पूर्ण केली. मात्र आज ट्विटरवर #कुठे_नेऊन_ठेवला_महाराष्ट्र हा हॅशटॅग ऑल इंडिया ट्रेण्डिंग होत आहे.


भाजपने विधानसभा निवडणुकीपूर्वी, प्रचाराद्वारे तत्कालीन सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कथित भ्रष्टाचारावर बोट ठेवलं होतं. त्यावेळी कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा या टॅगलाईनद्वारे भाजपची मोहिम सुरु होती.

मात्र आता दोन वर्षांनंतर जनताच फडवणीस सरकारला त्यांच्याच टॅगलाईनद्वारे जाब विचारत आहे. महाराष्ट्र सरकारने उद्योग, आरोग्य, शेती, शिक्षण, रस्ते आदींचा विकास कितपत केला, विविध समस्यांसाठी सरकारकडे उपाययोजना काय, असे प्रश्न  #कुठे_नेऊन_ठेवला_महाराष्ट्र  या हॅशटॅगद्वारे विचारले जात आहेत.

काही ट्विटवर एक नजर










संबंधित बातम्या

अरे, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, या जाहिराती बनवणारा पठ्ठ्या कोण? 


व्हॉट्स अॅपवर भाजपच्या जाहिरातीवरून जोक्सवर जोक्स, 'कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र' ट्रेण्डिंगमध्ये 


भाजपचा 'अरे! कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा'चा शोध थांबला