मुंबई : नुकताच भारतात आलेल्या 'आयफोन 7'ची गॅझेटप्रेमींमध्ये प्रचंड क्रेझ आहे. आयफोनची ही क्रेझ कोणाला काय करण्यास भाग पाडेल याला नेम आली. 'आयफोन 7'साठी एका तरुणाने चक्क त्याची ओळख बदलली.


युक्रेनमधील ओलेक्झांडर टुरीन या तरुणाने स्वत: नाव बदललून थेट 'आयफोन 7' ठेवलं. नाव बदलण्याचं कारण ऐकलं तर तुम्हालाही आश्चर्य वाटेल.



युक्रेनमधील एका दुकानात पहिल्या पाच जणांना आयफोन 7 फ्री देण्यात येईल, अशी ऑफर सुरु होती. मात्र यासाठी एकच अट होती. ती अट म्हणजे स्वत:चं नाव बदलून आयफोन 7 ठेवणं. ओलेक्झांडर स्वत:ला रोखू शकला नाही आणि त्याने तातडीने नाव बदललं.

नाव बदलण्यासाठी त्याला केवळ 2 डॉलर एवढाच खर्च आला. पण त्या मोबदल्यात त्याला ड्रीम फोन मिळाला, ज्याची किंमत तब्बल 850 डॉलर इतकी आहे.

https://twitter.com/KiSS925/status/792172724328263680

या वृत्ताला ओलेक्झांडर उर्फ 'आयफोन 7'ची बहिण तेत्याना पॅनिना दुजोरा दिला आहे. हे सगळं खरंय, मात्र यावर विश्वास ठेवणं कठीण जात आहे, असी तेत्याना म्हणाली.

पण थांबा, ओलेक्झांडरही स्मार्ट आहे. आयुष्यभर 'आयफोन 7' हे नाव घेऊन तो जगणार नाही. मुलंबाळं झाल्यावर तो पुन्हा 2 डॉलर खर्च करुन स्वत:चं नाव बदलणार आहे.