मुंबई : जगप्रसिद्ध अॅपल कंपनी लवकरच तीन नवे आयफोन हँडसेट लॉन्च करणार आहे. आयफोन 7, आयफोन 7 प्लस आणि आयफोन 7 प्रो अशी त्यांची नावं असणार आहेत.
आयफोन 7 ची स्क्रीन साईज 4.7 इंच, तर आयफोन 7 प्लस आणि 7 प्रो हँडसेटची स्क्रीन 5.5 इंत असेल. विशेष म्हणजे हे तिन्ही आयफोन 3D टच असणार आहेत. या हँडसेट्सच्या किंमतीही लीक झाल्या आहेत.
चीनमधील सोशल नेटवर्किंग साईट ‘विबो’नुसार, 32 जीबीच्या आयफोन 7 ची किंमत जवळपास 53 हजार रुपये असण्याची शक्यता आहे. तर 64 जीबीच्या आयफोन 7 ची किंमत जवळपास 61 हजार रुपये आणि 256 जीबीच्या आयफोनची किंमत 71 हजार रुपये असण्याची शक्यता आहे.
त्याचसोबत 32 जीबीच्या आयफोन 7 प्लसची किंमत 61 हजार रुपये, 128 जीबीच्या आयफोन 7 प्लसची 69 हजार आणि 256 जीबीच्या आयफोन 7 प्लसची किंमत 79 हजार रुपये असण्याची शक्यता आहे.
अॅपल कंपनीचे हे तिन्ही आगामी हँडसेट्समध्ये A10 प्रोसेसरसोबत असणार आहे. आयफोन 7 मध्ये 2 जीबी रॅम, आयफोन 7 प्लस आणि आयफोन 7 प्रोमध्ये 4 जीबी रॅम असेल, अशी चर्चा आहे. दोन्ही प्लस आणि प्रो हँडसेट्समध्ये एकाच प्रकारचे सीपीयूचा वापर केला जाणार असून, क्लॉक स्पीडही आधीच्या आयफोनपेक्षा अधिक असेल, असं म्हटलं जातं आहे.