मुंबई : HTC इंडियाने भारतात एचटीसी U अल्ट्रा आणि एचटीसी U प्ले असे दोन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. त्यातील एचटीसी U अल्ट्रा स्मार्टफोनची किंमत 59 हजार 990 रुपये एवढी आहे, तर एचटीसी U प्ले स्मार्टफोनची किंमत 39 हजार 990 रुपये आहे.


येत्या 6 मार्चपासून या दोन्ही स्मार्टफोनची विक्री सुरु केली जाणार आहे. ब्ल्यू, ब्लॅक, पिंक, व्हाईट कलरमध्ये या स्मार्टफोनचे व्हेरिएंट उपलब्ध आहेत.

'HTC U अल्ट्रा'चे फीचर्स :

- ऑपरेटिंग सीस्टिम : अँड्रॉईड नॉगट 7.0
- रॅम : 4 जीबी
- प्रोसेसर : 2.15GHz क्वाड कोअर क्वालकॉम प्रोसेसर
- डिस्प्ले : प्रायमरी 5.7 इंच, सेकंडरी 2 इंच, एचडी रिझॉल्युशन
- कॅमेरा : 16 मेगापिक्सेलचा फ्रंट आणि रिअर कॅमेरा
- मेमरी : 64 जीबी आणि 128 जीबी
- बॅटरी : 3000 mAh



'HTC U'चे फीचर्स :

- कॅमेरा : 16 मेगापिक्सेल (रिअर, फ्रंट फेसिंग)
- कनेक्टिव्हिटी : फिंगरप्रिंट सेन्सर, बूम साऊंड, 3D ऑडिओ रिकॉर्डिंग
- बॅटरी : 3000 mAh
- व्हेरिएंट एक - 3 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल मेमरी
- व्हेरिएंट दोन - 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल मेमरी
- 5.2 इंचाच्या स्क्रीन (1080×1920 पिक्सेल रिझॉल्युशन)
- ऑक्टाकोर मीडिया टेक हेलियो P10 प्रोसेसर