रिलायन्स जिओच्या 'हॅप्पी न्यू इयर' या ऑफरमुळे ग्राहकांना 31 मार्च 2017 पर्यंत अनलिमिटेड 4 G डेटा, मोफत व्हॉईस आणि व्हिडिओ कॉलिंगची सेवा मिळणार आहे. रिलायन्स जिओला ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात यश मिळालं आहे. त्यामुळे आता आपले ग्राहक कमी होऊ नयेत, यासाठी इतर कंपन्यांमध्ये रस्सीखेच सुरु झाली आहे.
काय आहे व्होडाफोनची ऑफर?
रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेल, आयडियानंतर आता वोडाफोनही फ्री सेवा देण्याच्या शर्यतीत सामील झालं आहे. वोडाफोननं देशभरात अनलिमिटेड फ्री कॉलिंग प्लान लाँच केला आहे.
प्रीपेड यूजर्ससाठी 144 रुपयांच्या पॅकपासून सुरवात असणार आहे. या पॅकमध्ये देशभरात वोडाफोन टू वोडाफोन फ्री अनलिमिटेड कॉलिंग असणार आहे. तसेच 500 एमबी डेटाही मिळेल. या पॅकची व्हॅलिडेटी 28 दिवसांपर्यंत असणार आहे. तर 344 रुपयांच्या पॅकवर वोडाफोनच्या सर्व मोबाइल नेटवर्कवर अनलिमिटेड कॉल फ्री असणार आहे. तसेच नॅशनल रोमिंग फ्री असणार आहे. तसेच यूजर्सला 1 जीबी 4जी डेटा मिळेल.
काय आहे एअरटेलची ऑफर?
रिलायन्स जिओने आपल्या मोफत सेवेला ‘हॅप्पी न्यू ईयर ऑफर’च्या माध्यमातून मार्चपर्यंत वाढवल्याने आता एअरटेलनेही दोन नवे प्लॅन लाँच केले. या नव्या प्लॅननुसार 4G डेटासोबत अनलिमिटेड लोकल-एसटीडी व्हॉईस कॉल मिळणार आहेत. यामध्ये 145 रुपयांच्या प्लॅनचा समावेश आहे.
एअरटेलच्या 145 रुपयांच्या प्लॅनमध्ये 300 एमबी 4G डेटासोबत एयरटेल ते एअरटेल मोफत लोकल-एसटीडी व्हॉईस कॉलची सुविधा मिळेल. 345 रुपयांच्या प्लॅनमध्ये देशात कुठल्याही नेटवर्कवर मोफत लोकल-एसटीडी कॉलसोबत 1 जीबी 4G डेटा मिळेल. दोन्ही प्लॅनची व्हॅलिडिटी 28 दिवस असेल आणि देशभरातील एअरटेलच्या ग्राहाकांसाठी हे प्लॅन उपलब्ध असतील.
काय आहे आयडीयाची ऑफर?
आयडीयानेही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काही खास प्लॅन आणले आहेत. आयडियाच्या 1199 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड लोकल-एसटीडी व्हॉईस कॉलिंग, 5 GB 3 G डेटा आणि 3 हजार लोकल-एसटीडी एसएमएस मिळणार आहेत.
यानंतर 1599 रुपयांचीही एक ऑफर लाँच केली आहे. यामध्ये अनलिमिटेड लोकल-एसटीडी कॉलिंग, 10 GB 3 G डेटा आणि 3 हजार लोकल-एसटीडी एसएमएस मिळणार आहेत.
संबंधित बातम्या :