Smart Watch Health Effect : स्मार्टवॉच वापरणए ही एक फॅशन बनली आहे. स्मार्टवॉचची क्रेझ तरुणांपासून वृद्धापर्यंत पाहिली जाऊ शकते. बाजारात कंपन्या सतत एकापेक्षा एक चांगले स्मार्टवॉच लॉन्च करत असतात, जे लोकांनाही खूप आवडतात. बर्‍याच कंपन्यांचा असा दावा आहे की स्मार्टवॉच लोकांचं हेल्थ चांगल्या प्रकारे मॉनिटर करु शकतात. मात्र स्मार्टवॉचबद्दल काही विवाद आहेत, ज्याची वास्तविकता जाणून घेणे आवश्यक आहे.


स्मार्टवॉच आरोग्यासाठी हानिकारक आहे का?


बरेच लोक हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत की स्मार्टवॉच वापरल्यामुळे लोकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतात का?  तज्ञांच्या मते स्मार्टवॉचचा जास्त वापर करणे हानिकारक असू शकते. वास्तविक स्मार्टवॉचेस इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड (EMF) रेडिएशन तयार करतात, जे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. याशिवाय रेडिएशनचा आरोग्यावर अनेक नकारात्मक प्रभाव पडतो.


या समस्या असू शकतात



  • जर तुम्ही स्मार्टवॉच 24 तास घालत असाल तर त्यातून निर्माण होणाऱ्या रेडिएशनमुळे डोकेदुखी होऊ शकते. म्हणून, स्मार्टवॉच जास्त काळ घालू नये.

  • बहुतेक वेळा असे दिसून आले आहे की रात्री उशिरापर्यंत लोक स्मार्टवॉचचा वापर करत असतात, ज्यामुळे झोपेचा त्रास होतो. झोपे मोड झाल्यामुळे मूड स्विंगची समस्या उद्भवू शकते.

  • बर्‍याच लोकांना सवय असते की ते पुन्हा पुन्हा त्यांच्या स्मार्टवॉचकडे पाहतात. असं केल्याने ते इतर कामांवर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. या समस्येला बॉडी डिस्मोरफिया असं म्हणतात.