मुंबई : स्मार्टफोन कंपनी iQOO ने भारतात आपला नवा स्मार्टफोन  iQOO Z3 5G लॉन्च केला आहे. कंपनीने हा फोन तीन व्हेरिएंटसोबत मार्केटमध्ये लॉन्च केला आहे. फोनमध्ये दमदार स्नॅपड्रॅगन 768G 5G प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. त्यासोबतच फोनमध्ये खास पाच लेयर लिक्विड कूलिंग टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. यामुळे फोन हीट आणि हँग होण्यासारख्या समस्यांचा सामना युजर्सना करावा लागणार नाही. जाणून घेऊया फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स...


काय आहे किंमत?


iQOO Z3 5G चा 6 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज असणाऱ्या व्हेरियंट्सची किंमत 19,990 रुपये ठरवण्यात आली आहे. तर याचा 8 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज असणाऱ्या व्हेरियंट्सची किंमत 20,990 रुपये असणार आहे. तसेच 8 GB रॅम आणि 256 GB इंटरनल स्टोरेज असणाऱ्या व्हेरियंटची किंमत कंपनीने 20,990 रुपये ठेवली आहे. जर तुम्हाला हा फोन खरेदी करायचा असेल, तर कंपनीची ऑफिशिअल वेबसाइट आणि अॅमेझॉनवरुन तुम्ही हा फोन खरेदी करु शकता. 


स्पेसिफिकेशन्स


iQOO Z3 5G स्मार्टफोनमध्ये 6.58 इंचाचा फुल HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचं रिझॉल्यूशन 1,080x2,408 पिक्सल आहे. हा फोन अॅन्ड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 768G प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये 8GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज देण्यात आलं आहे. ज्याला मायक्रोएसडी कार्ड मार्फत 1TB पर्यंत वाढवता येणार आहे. 


कॅमेरा 


iQOO Z3 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्याचा प्रायमरी कॅमेरा 64 मेगापिक्सल आहे. सेकेंडरी कॅमेरा 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रावाइड अँगलसोबत देण्यात आला आहे. तसेच 2 मेगापिक्सलची मायक्रो लेंस आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यामध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. 


बॅटरी आणि कनेक्टिव्हिटी 


iQOO Z3 5G स्मार्टफोनमध्ये 4400mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. जी 55W फास्ट चार्जिंग सपोर्टसोबत येते. कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये 5G ड्यूल बँड, व्हाय-फाय, जीपीएस, ब्ल्यूटूथ v5.1, एनएफसी आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट यांसारखे फिचर्स देण्यात आले आहेत. फोनचं डायमेंशन 163.95 x 75.30 x 8.50 आणि वजन 185 ग्राम आहे. हा फोन एस ब्लॅक आणि सायबर ब्ल्यू कलर ऑप्शंसमध्ये उपलब्ध असणार आहे. 


POCO M3 Pro 5G  होणार लॉन्च 


iQOO Z3 5G ची भारतात POCO M3 Pro 5G सोबत स्पर्धा होणार आहे. या फोनमध्ये 6.50 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचं रिझॉल्यूशन 1080x2400 पिक्सल आहे. हा फोन MediaTek Dimensity 700 SoC प्रोसेसरयुक्त असणार आहे. फोन अॅन्ड्रॉईड 11 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. यामध्ये 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज देण्यात आलं आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Apple WWDC 2021: Apple च्या जागतिक परिषदेत मोठ्या घोषणांची बरसात, युजर्ससाठी पर्वणी