मुंबई : भारतातील अॅपलप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. अॅपलच्या आयफोन X च्या प्री-ऑर्डरची तारीख कंपनीकडून जाहीर करण्यात आली आहे. आजपासून म्हणजेच 27 ऑक्टोबरपासून 'आयफोन एक्स'ची प्रि-ऑर्डर सुरु होणार आहे.


3 नोव्हेंबर रोजी 'आयफोन X' भारतात लॉन्च होणार आहे. म्हणजेच, लॉन्चिंगच्या आठवडाभर आधीच आयफोन एक्सची भारतात प्रि-ऑर्डर सुरु करण्यात येत आहे.

आयफोन X च्या 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 89 हजार, तर 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 1 लाख 2 हजार रुपये असेल, अशी माहिती मिळते आहे.

iPhoneX, iPhone 8, 8 Plus ची भारतातील किंमत, फीचर्स आणि सर्व काही


यावेळी 3 नोव्हेंबर रोजी भारतासह अमेरिका आणि इंग्लंडमध्येही आयोफोन X लॉन्च केला जाणार आहे. मात्र भारतासह ऑस्ट्रेलिया, चीन, फ्रान्स, जर्मनी, हाँग काँग, जपान, रशिया, इंग्लंड, अमेरिका या देशांमध्येही 27 ऑक्टोबरपासूनच प्रि-ऑर्डर सुरु केली जाणार आहे.

5.8 इंच स्क्रीन आयफोन X ला असेल. आयफोन 8 चा स्क्रीन 5.5 चा आहे. म्हणजेच पॉईंट 3 ने मोठा स्क्रीन आयफोन Xचा आहे. या आयफोनच्या माध्यमातून अॅपल पहिल्यांदाच फेस आयडी टेक्नोलॉजी आणणार आहे.

27 ऑक्टोबरला प्रि-ऑर्डर केल्यानंतर आयफोन एक्स हातात येण्यासाठी अर्थात आठवड्याभराची वाट पाहावी लागणार आहे.

संबंधित बातम्या

iPhoneX, iPhone 8, 8 Plus ची भारतातील किंमत, फीचर्स आणि सर्व काही

आयफोन 8, आयफोन 8 प्लस आणि आयफोन Xचे खास फीचर

आयफोन 8, आयफोन 8 प्लस आणि आयफोन X : अॅपल इव्हेंटबद्दल सर्व काही