मुंबई : अॅपलने तीन नवे आयफोन, ज्यामध्ये iPhone XS, iPhone XS Max, आणि iPhone XR यांचा समावेश आहे, हे लाँच केले आहेत. यानंतर ग्राहकांसाठी आणखी एक मोठी खुशखबर म्हणजे आयफोनच्या जुन्या मॉडलच्या किंमतीत भरघोस कपात करण्यात आली आहे.
आयफोन 6S 32 जीबी तुम्ही केवळ 29 हजार 900 रुपयांपासून खरेदी करु शकता. ज्या ग्राहकांना मोठ्या स्क्रीनचा आयफोन हवा असेल, त्यांना 6S प्लस 34 हजार 900 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.
आयफोनच्या वेबसाईटनुसार, iPhone SE, iPhone 6s, iPhone 6s Plus, आणि iPhone X च्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. हे सर्व फोन अमेरिकेत बंद करण्यात आले आहेत, मात्र भारतात अजूनही चालू आहेत. भारतात सध्या फक्त एसई व्हर्जन बंद असून इतर व्हेरिएंट खरेदी करता येतील.
गेल्या वर्षी आयफोन X ची किंमत 91 हजार 900 रुपये होती, जो 64 जीबी व्हेरिएंटमध्ये होता. तर आता 256 जीबी व्हेरिएंटची किंमत 1,06,900 रुपये आहे. गेल्या वर्षी आयफोन 8 आणि आयफोन 8 प्लस हे दोन आयफोन लाँच करण्यात आले होते, ज्यांच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे.
आयफोनच्या 8 च्या 64 जीबी व्हेरिएंटची किंमत 59 हजार 900 रुपये आहे, तर 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 74 हजार 900 रुपये आहे. यापूर्वी 12 सप्टेंबरलाही किंमतीत कपात करण्यात आली तेव्हा, किंमत अनुक्रमे 67 हजार 940 आणि 81 हजार 500 रुपये होती.
आयफोन 8 प्लसच्या 64 जीबी व्हेरिएंटची किंमत 77 हजार 560 रुपयांवरुन 69 हजार 900 रुपये करण्यात आली आहे. तर 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 91 हजार 110 रुपये होती, ती आता 84 हजार 900 रुपये झाली आहे.
आयफोन 7- 32 जीबी, 39,900 रुपये (अगोदर- 52,370 रुपये)
आयफोन 7- 128 जीबी- 49,900 रुपये (अगोदर 61,560 रुपये)
आयफोन 7 प्लस- 32 जीबी- 49,900 (अगोदर 62,840 रुपये)
आयफोन 7 प्लस- 128 जीबी-59,900 रुपये (अगोदर 72,060 रुपये)
आयफोन 6 एस- 32 जीबी- 29,900 रुपये (अगोदर 42,900 रुपये)
आयफोन 6 एस- 128 जीबी- 39,900 रुपये (अगोदर 52, 240 रुपये)
आईफोन 6 एस प्लस- 32 जीबी- 39,900 रुपये (अगोदर 52, 240 रुपये)
आयफोन 6 एस प्लस- 128 जीबी- 44,900 रुपये (अगोदर 61,450 रुपये)
अॅपलचे नवे आयफोन येताच जुन्या मॉडलच्या किंमतीत भरघोस कपात
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Sep 2018 06:30 PM (IST)
ग्राहकांसाठी आणखी एक मोठी खुशखबर म्हणजे आयफोनच्या जुन्या मॉडलच्या किंमतीत भरघोस कपात करण्यात आली आहे. आयफोन 6S 32 जीबी तुम्ही केवळ 29 हजार 900 रुपयांपासून खरेदी करु शकता.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -