नवी दिल्ली : जगातील तंत्रज्ञान कंपन्यांची शिरोमणी अर्थात अॅपल कंपनीचा मोस्ट अवेटेड आयफोन SE अखेर भारतात ऑफिशिअली दाखल झाला आहे. भारतात आयफोन SE च्या 32 जीबी मॉडेलची किंमत 39 हजार रुपये आणि 64 जीबी मॉडेलची किंमत 49 हजार रुपये आहे. या दोन्ही मॉडेलसह अॅपल कंपनीने आपलं दुसरं डिव्हाईस आयपॅड प्रोसुद्धा लॉन्च केला आहे. या 9.7 इंचाच्या आयपॅड प्रोच्या 32 जीबी मॉडेलची किंमत 49 हजार 900 रुपये आहे. आयफोन SE हा 4 इंचाचा स्क्रीनवाला आयफोन जगातील दुसरा पॉवरफुल स्मार्टफोन आहे.
आयफोन SE चा लूक आयफोन 5S सारखाच आहे. स्क्रीन, कॉर्नरची ब्लेज, जाडी आयफोन 5s सारखी आहे. सर्वोत्तम कॅमेरा या स्मार्टफोनची खासियत आहे. 12 मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा देण्यात आला असून आयफोन 6s मध्ये या कॅमेऱ्याचा वापर केला गेला आहे.
आयफोन SE मध्ये 4 इंचाचा डिस्प्ले आहे. A9 प्रोसेसर आणि M9 मोशन प्रोसेसर देण्यात आला आहे. 12 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि 4K व्हिडीओ रिकॉर्डिंग फीचर आहेत. आयफोन SE मध्ये वाय-फाय, ब्लूटूथ, LTE आणि अॅपल पे देण्यात आले आहेत.
अॅपलने आयफोन SE सोबत 9.7 इंचाचा आयपॅड प्रोही लॉन्च केला. अॅपलचा हा 12 वा टॅबलेट आहे. 2010 साली अॅपलने पहिला आयपॅड लॉन्च केला.
9.7 इंचाचा आयपॅड प्रो सिल्व्हर, स्पेस ग्रे, गोल्ड आणि रोज गोल्ड रंगांमध्ये उपलब्ध आहे. याची किंमत 49 हजार 900 रुपयांपासून सुरु होते. 32 जीबी स्टोरेज व्हेरिएंट (वायफाय ओन्ली) मॉडेलची किंमत 49,900 रुपये आहे, तर 32 जीबी (वायफोय + सेल्युलर) व्हेरिएंटती किंमत 61, 900 रुपये आहे.