ही घटना चीनच्या एका सेकंड हॅण्ड इलेक्ट्रॉनिक मार्केटमधील आहे. डोळ्याची पापणी मिटताच आयफोनच्या बॅटरीचा स्फोट झाला. आयफोनमधील लीथियम बॅटरी युजर स्वत: काढू शकत नाही. त्यामुळे टेक्निशनच सावधरित्या ही बॅटरी काढून दाखवू शकतो.
या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात ती व्यक्ती एका स्त्रीसोबत दिसत आहे. बॅटरी तपासण्यासाठी ती तोंडात ठेवून दाबून पाहत असताना त्यात स्फोट होतो.
या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. बॅटरीच्या स्फोटाचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. बॅटरी फारच जुनी होती. पण ती खरी होती की बनावट होती हे समजू शकलेलं नाही.
पाहा व्हिडीओ