मुंबई : अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 2018-19च्या अर्थसंकल्पात स्मार्टफोनवरील कस्टम ड्युटी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या घोषणेने आयफोनच्या किमतींमध्ये बराच फरक पडला आहे.
अर्थसंकल्पानंतर चार दिवसांनी अॅपलने आपल्या आयफोनच्या किमतीत 3 ते 6 टक्क्यांनी वाढ केली आहे. पण भारतात तयार होणाऱ्या आयफोन SEच्या किंमतीत काहीही फरक पडलेला नाही.
येत्या काळात आयफोन आणखी महाग होण्याची शक्यता आहे. कारण की, एप्रिल महिन्यापासून नवी कस्टम ड्युटी लागू होईल. त्यामुळे आयफोनच्या किमतीत वाढ होईल.
अॅपल आयफोनच्या नव्या किमती
- आयफोन 6 (32 जीबी) - आधीची किंमत 30,780 सध्याची किंमत 31,900 रुपये
- आयफोन 6S (32 जीबी) - आधीची किंमत 41,550 सध्याची किंमत 42,900 रुपये
- आयफोन 6S प्लस (32 जीबी) सध्याची किंमत 61,450 रुपये
- आयफोन 7 (32 जीबी) - आधीची किंमत 50,810 सध्याची किंमत 52,370 रुपये
- आयफोन 7 प्लस (32 जीबी) - आधीची किंमत 61,060 सध्याची किंमत 62,840 रुपये
- आयफोन 8 (64 जीबी) - आधीची किंमत 66,120 सध्याची किंमत 67,940 रुपये
- आयफोन 8 प्लस (64 जीबी) - आधीची किंमत 75,450 सध्याची किंमत 77,560 रुपये
- आयफोन X (64 जीबी) - आधीची किंमत 92,430 सध्याची किंमत 95,390 रुपये
अॅपलचा चाहत्यांना मोठा धक्का, आयफोनच्या किमतीत वाढ
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Feb 2018 10:11 AM (IST)
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 2018-19च्या अर्थसंकल्पात स्मार्टफोनवरील कस्टम ड्युटी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या घोषणेने आयफोनच्या किमतींमध्ये बराच फरक पडला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -