मुंबई : अॅपल 12 सप्टेंबरला म्हणजे उद्याच आयफोन 8 लाँच करणार आहे. पण त्याआआधीच या फोनबद्दल बरीच चर्चा सुरु आहे. काही रिपोर्ट्सनुसार या स्मार्टफोनचं नाव आयफोन X असेल. आयफोन 8 बद्दल याआधीही काही रिपोर्ट लीक झाले आहेत. आयफोन 8 नेमका असणार कसा याकडे सर्वांचच लक्ष लागून राहिलं आहे. यामध्ये अनेक नवनवीन फीचर्स असल्याचा दावा काही रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे.
नव्या आयफोनच्या डिझाइनमध्ये मोठा बदल होणार असल्याची सध्या चर्चा आहे. यामध्ये बेजल-फ्री OLED डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. असं झाल्यास हा सर्वात मोठा बदल असेल.
आयफोन 8 मध्ये फ्रंट कॅमेऱ्यात 3D फेस स्कॅनिंग असेल असाही अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ज्यामुळे फक्त चेहरा पाहूनच आयफोन अनलॉक होईल. आतापर्यंत टच आयडी सेंसर तंत्रज्ञानाचा वापर झाला आहे.
या नव्या स्मार्टफोनची किंमत किती असणार याची सध्या बरीच चर्चा आहे. अॅपलचा हा आतापर्यंतचा सर्वात महागडा फोन असेल असंही समजतं आहे. याची किंमत 999 डॉलरपेक्षा जास्त असू शकते. आयफोन 7चं सर्वात महागड्या व्हेरिएंटची किंमत 969 डॉलर आहे.
आयफोन 8 मध्ये कंपनी वायरलेस चार्जिंग फीचरही देऊ शकतं. आयफोनमध्ये आतापर्यंत Qi चार्जिंगचा वापर करण्यात आला आहे. पण बाजाराची गरज ओळखता आयफोन वायरलेस चार्जिंगचा ऑप्शन देऊ शकतं.
आयफोन टच होम बटन काढून त्याऐवजी दुसरं फीचर देऊ शकतं असं म्हटलं जात आहे. मात्र, नेमकं कोणतं फिचर मिळणार याबाबत सध्या नेमकी माहिती मिळू शकलेली नाही.
दरम्यान, आयफोन 8 कसा असणार आणि त्याचे फीचर कसे असतील याची संपूर्ण माहिती काही तासात मिळेलच.
अवघ्या काही तासात आयफोन 8चं लाँचिंग!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Sep 2017 02:25 PM (IST)
अॅपलचा नवा आयफोन अवघ्या काही तासात लाँच होणार आहे. या नव्या स्मार्टफोनमध्ये अनेक नवे फीचरही असणार आहेत. त्यामुळे आयफोन चाहत्यांमध्ये या स्मार्टफोनविषयी बरीच उत्सुकता आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -