मुंबई : अॅपलचा आगामी आयफोन 8, आयफोन 8 प्लस आणि आयफोन X हे फोन लाँच होण्यासाठी काही तास उरले आहेत. या फोनची किंमत आणि फीचर्स याविषयी जोरदार चर्चा सुरु आहे. फोनच्या लाँचिंगला काही तास उरलेले असतानाही या फोनच्या नेमक्या फीचर्सबद्दल सस्पेंस कायम आहे.
नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, अॅपल आयफोन X लाँच करणार आहे. यामध्ये वायरलेस चार्चिंग फीचर, फेस डिटेक्शन, एज टू एज डिस्प्ले आणि पहिल्यांदाच होम बटण नसेल. आयफोन 8 आणि आयफोन 8 प्लस या दोन्ही फोनसोबत हा फोन लाँच केला जाईल. कंपनीचा हा सर्वात महागडा फोन असण्याची शक्यता आहे. या फोनची किंमत अमेरिकेत 1000 डॉलर म्हणजे जवळपास 63 हजार 785 रुपये (कर, सेस वगळून) असण्याची शक्यता आहे.
अॅपल इव्हेंट कसा पाहणार?
अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये 12 सप्टेंबर रोजी अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कूक हे फोन लाँच करतील. अमेरिकेतील वेळेनुसार सकाळी 10 वाजता म्हणजे भारतीय वेळेनुसार रात्री 10.30 वाजता हा कार्यक्रम सुरु होईल. दरवर्षीप्रमाणे अॅपलच्या वेबसाईटवर हा कार्यक्रम लाईव्ह पाहता येईल.
लाँचिंगनंतर साधारणतः एका आठवड्यात हा फोन विक्रीसाठी उपलब्ध होईल. मात्र आयफोन 8 साठी 15 सप्टेंबरपासूनच प्री बुकिंग करता येईल. तर 22 सप्टेंबरपासून हा फोन बाजारात उपलब्ध होईल.
अॅपल इव्हेंटमध्ये कोणते फोन लाँच होणार?
आयफोन 8, आयफोन 8 प्लस आणि आयफोन X हे तीन फोन अॅपलच्या कार्यक्रमात लाँच होणार आहेत. अॅपलने पहिला फोन लाँच करुन दहा वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने आयफोन X हा खास फोन लाँच केला जाणार आहे. कंपनीने पहिला फोन लाँच करुन दहा वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयफोन X ला नवं नाव दिलं जाण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षी लाँच केलेल्या आयफोन 7 पेक्षा या फोनमध्ये अपडेटेड फीचर्स असतील. फोनच्या डिझाईनमध्येही काही बदल अपेक्षित आहेत. तर आयफोन 8 आणि आयफोन 8 प्लसची बॅटरी लाईफ वाढलेली असेल. दरम्यान आयफोन X हा कंपनीचा सर्वात महागडा फोन असेल, असं बोललं जात आहे.
आयफोन 8 आणि आयफोन 8 प्लसचे फीचर्स
आयफोन 8 मध्ये 4.7 इंच आकाराची, तर आयफोन 8 प्लसमध्ये 5.5 इंच आकाराची स्क्रीन असेल. या फोनला वायरलेस चार्जिंग आणि आयफोन 8 प्लस साठी ड्युअल रिअर कॅमेरा ही फीचर्स असण्याची शक्यता आहे. मात्र या फोनच्या सर्व फीचर्सबाबतचा सस्पेंस अजूनही कायम आहे.
अॅपल वॉच 3
या आयफोन इव्हेंटमध्ये आयफोन 8, आयफोन 8 प्लस आणि आयफोन X या फोनसोबत एलटीई सपोर्टसह अॅपल वॉच 3 देखील लाँच होणार आहे.
अॅपल 4K टीव्ही
4K रिझोल्युशनसह अॅपल टीव्हीही या इव्हेंटमध्ये लाँच केली जाण्याची शक्यता आहे. ब्लुमबर्गच्या वृत्तानुसार या अॅपल टीव्हीमध्ये 4K रिझोल्युशनसह लाईव्ह स्ट्रिमिंग फीचर असेल.
अॅपल iOS 11, MacOS High Sierra, अॅपल वॉच OS 4
आयफोन, मॅकबुक आणि वॉचेससाठी आयओएसची नवी अपडेट या इव्हेंटमध्ये रिलीज केली जाण्याची शक्यता आहे. या नव्या अपडेटमध्ये अनेक फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे.
आयफोन 8, आयफोन 8 प्लस आणि आयफोन X : अॅपल इव्हेंटबद्दल सर्व काही
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Sep 2017 07:55 PM (IST)
आयफोन 8, आयफोन 8 प्लस आणि आयफोन X हे फोन लाँच होण्यासाठी काही तास उरले आहेत. या फोनची किंमत आणि फीचर्स याविषयी जोरदार चर्चा सुरु आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -