मुंबई : इंटेक्स या स्मार्टफोन कंपनीने शुक्रवारी आपला नवा स्मार्टफोन अॅक्वा फिश बाजारात आणला आहे. हा सेल्फीश ऑपरेटींग सिस्टीमवर चालणारा जगातील पहिलाच स्मार्टफोन असून हा स्मार्टफोन जोला सेल्फीश 2.0 ऑपरेटींग सिस्टीमवर चालतो. हा स्मार्टफोन ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट ईबेवर विक्रीसाठी उपलब्ध असून त्याची किंमत 5,499 रूपये आहे.

 

हा स्मार्टफोन 5 इंचाच्या स्क्रिनसोबत येत असून यामध्ये ड्युअल सिम कार्ड सपोर्ट आहे. याचे स्क्रिन रेझ्युलेशन 720x1280 असून यात 1.3GHz क्वाड कोअर स्नॅपड्रॅगन प्रोसेसरही देण्यात आला आहे. तसेच यात 2 जीबीची रॅमही देण्यात आली आहे.

 

फोटोग्राफिसाठी यात 8 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा देण्यात आला असून 2 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेराही देण्यात आला आहे. 16 जीबी इंटरनल मेमरी या स्मार्टफोनमध्ये देण्यात आली असून ती 32 जीबी पर्यंत वाढवता येणार आहे.

 

या स्मार्टफोनमध्ये 4G LTE, WiFi 802.11, Bluetooth 4.0, GPS, USB, यासारखे बरेच फीचर्स देण्यात आले असून ब्लॅक आणि ऑरेंज व्हेरीअंटमध्ये हा फोन उपलब्ध होणार आहे.