मुंबई : 4G स्मार्टफोनची वाढती मागणी असतानाही इंटेक्स कंपनीने 3G स्मार्टफोन लॉन्च केला आहे. अॅक्वा इको 3G असे या स्मार्टफोनचे नाव असून, 2 हजार 400 रुपये किंमत या स्मार्टफोनची आहे.


फीचर्स :

इंटेक्स अॅक्वा इको 3G स्मार्टफोन ड्युअल सिमचा असून, अँड्रॉईड 4.4 किटकॅट ऑपरेटिंग सिस्टमवर चालणारा आहे. यामध्ये 480×800 पिक्सेल रिझॉल्युशनचा 4 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. 1GHz ड्युअल कोर प्रोसेसरसोबत 256MB रॅम आहे. 512 एमबी इंटरनल स्टोरेज देण्यात आले असून, 32 जीबीपर्यंत एसडी कार्डच्या सहाय्याने वाढवण्याची सुविधा आहे.

कॅमेरा आणि कनेक्टिव्हिटी :

या स्मार्टफोनमध्ये रिअर आणि फ्रंट असे दोन्ही कॅमेरे 0.3 मेगापिक्सेल आहेत. रिअर कॅमेऱ्यासोबत फ्लॅश देण्यात आला आहे. 1400mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून, कनेक्टव्हिटीमध्ये 3G, ब्लूटूथ, एफएम रेडिओ, यूएसबी, 3.5mm ऑडिओ जॅक इत्यादी फीचर्स आहेत. ब्ल्यू, ब्लॅक आणि व्हाईट या तीन रंगांचे व्हेरिएंट इंटेक्स कंपनीने या स्मार्टफोनचे लॉन्च केले आहेत.