लँड रोव्हर वेलारशी संबंधित रंजक गोष्टी :
- डिझाईन – लँड रोव्हर वेलारचं डिझाईन कूपे व्हर्जनसारखं आहे. आयक्यू-एआय प्लॅटफॉर्मवर ही कार तयार करण्यात आली आहे. कारचं वजन कमी ठेवण्यासाठी 81 टक्के हलक्या मात्र तितकंच मजबूत अॅल्युमिनियमचा वापर करण्यात आला आहे.पुढील बाजूस हनी-मॅस ग्रिल आणि रेंज रोव्हरसारखे एलईडी स्वेप्ट-बॅक हेडलॅम्प्स, एलईडी डे-टाईम रनिंग लॅम्प्स देण्यात आले आहेत. मागच्या बाजूस एलईडी टेललॅम्प्स लावण्यात आले आहेत. बाजूला फ्लश-फिटिंग डोअर हँडल वापरण्यात आले आहेत. लँड रोव्हर वेलारला 22 इंचाचा अलॉय व्हील असून, भारतात 18 किं 19 व्हीलची मॉडेल लॉन्च केली जाऊ शकते.
- इंजिन – आंतरराष्ट्रीय बाजारात लॉन्च करण्यात येणाऱ्या लँड रोव्हर वेलारला सहा पेट्रोल आणि डिझेल इंजिन असून, सर्व इंजिन झेडएफ 8 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडले जातील. ऑल व्हील ड्राईव्हसाठी या लँड रोव्हरला टेरेन रिस्पॉन्स सिस्टम देण्यात आली आहे.भारतात दोन डिझेल इंजिनची लँड रोव्हर वेलार लॉन्च केली जाणार आहे. 180 पीएस पॉवरचं 2.0 लीटर डिझेल इंजिन, तर दुसरं 300 पीएस पॉवरचं 3.0 लीटर व्ही-6 डिझेलचं इंजिन असेल.
- फीचर्स – लँड रोव्हर वेलारने फीचर्समध्ये कोणतीही कमी ठेवली नही. मिड-साईज लग्झरी एसयूव्हीमध्ये जे फीचर्स असतात, ते सर्व फीचर्स लँड रोव्हर वेलारमध्ये आहेतच. त्याचसोबत, कंपनीने वेलार एसयूव्हीसाठी एक स्मार्टफोन अॅप्लिकेशनही तयार केलंय. या अॅपच्या माध्यमातून कारला लॉक किंवा अनलॉक करु शकता. शिवाय, मायलेज, क्लायमेट कंट्रोल आणि लोकेशनबाबत माहिती मिळू शकते. मनोरंजनासाठी 1600 वॉटचा मेरिडियन ऑडिओ सिस्टम, 23 स्पिकर्स देण्यात आले आहेत.
- कम्फर्ट – लँड रोव्हर वेलारमध्ये एअर सस्पेन्शन देण्यात आले असून, या कारच्या सीट्सला 20 प्रकारे अॅडजस्ट केलं जाऊ शकतं. विशेष म्हणजे सीट्स थंडीत गरम आणि उन्हाळ्यात थंड राहतात. तशी सुविधा देण्यात आली आहे. कारमधील पुढील सीट्सचं आर्मरेस्ट दोन भागांमध्ये विभागलं असून, आपल्या कम्फर्टनुसार अॅडजस्ट करता येतात.
भारतात लॉन्च होणाऱ्या लँड रोव्हर वेलारमध्ये कोणते फीचर्स दिले जातील, याबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आली नाही. मात्र, आंतरराष्ट्री बाजारात लॉन्च होणाऱ्या कारमध्ये वरीलप्रमाणे फीचर्स असतील.