Instagram Latest Feature : जर तुम्ही इंस्टाग्रामवर खूप अॅक्टिव्ह असाल, दररोज एखादी पोस्ट शेअर करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्हाला तुमच्या जुन्या आवडत्या पोस्ट शोधण्यासाठी पुन्हा पुन्हा खाली स्क्रोल करावे लागणार नाही. इन्स्टाग्रामवर लवकरच 'पिन पोस्ट' नावाचे एक नवीन फीचर येणार आहे. 'पिन पोस्ट'च्या मदतीने वापरकर्त्यांना एखादी पोस्ट पिन करता येणार आहे.
नवीन फीचर काय आहे?
'पिन पोस्ट' हे फीचर वापरकर्त्यांसाठी अतिशय फायदेशीर आहे. या फीचरद्वारे वापरकर्ते कोणतीही रील, फोटो आणि व्हिडीओ पिन करू शकतात. तसेच या फीचरमुळे जुन्या पोस्ट शोधण्यात विलंबदेखील होणार नाही. जी पोस्ट वापरकर्ते पिन करतील ती पोस्ट त्यांच्या होम पेजवरदेखील दिसणार आहे.
नुकतेच 'हे' खास फीचर केले होते लाँच
इन्स्टाग्रामने नुकतेच एक खास फीचर लाँच केले होते. या फीचरचे नाव अपकमिंग लाईव्ह स्ट्रीम Upcoming Live Streams असे आहे. फॉलोअर्सला संपर्कात ठेवण्यासाठी हे फीचर कार्य करते.
इंस्टाग्रामवर रिल्स किंवा व्हिडिओ असे कंटेट बनवणाऱ्यांसाठी इंस्टाग्राम नवे सबस्क्रिप्शन फिचर आणणार आहे. सबस्क्रिप्शनमुळे कंटेट निर्मार्त्यांना युजर्ससोबत विशेष लाईव्ह सत्रे आणि परस्पर संवाद उत्तम प्रकारे करता येईल. या फिचरमुळे लाईव्ह सत्रामध्ये चाहत्यांबरोबर स्टिकर्ससह परस्पर संवाद साधता येईल. निर्मात्यांना कमेंट आणि मेसेजच्या पुढे सदस्य बॅच (Subscriber Badge) दिसेल, यामुळे त्यांना त्यांचे फॉलोअर्स सहजपणे दिसतील.
संबंधित बातम्या
iPhone : मास्क घातल्यानंतही फेस आयडी वापरून आयफोन करा अनलॉक; काय आहे अॅपलचं नवं फिचर
WhatsApp New Feature : आता वाढणार ग्रुप अॅडमिनची ताकद, तुम्हाला पाहिजे तेव्हा ग्रुपमधून कोणताही मेसेज डिलीट करू शकता
What is Metaverse: ‘मेटाव्हर्स’ म्हणजे नेमकं आहे तरी काय? आपल्या आयुष्यावर याचा कसा परिणाम होऊ शकतो
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha