How to Earn from Instagram: जर तुम्ही सोशल मीडियावर सक्रिय असाल किंवा सोशल मीडियाबद्दल तुम्हाला ज्ञान असेल तर इंन्स्टाग्राम चांगलंच माहिती असेल. कधीकाळी केवळ फोटो शेअरिंग अॅप अशी ओळख असणारे हे अॅप आता पैसे कमावून देणारे अॅप बनले आहे. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तुम्ही बंपर कमाई करू शकता.


अशा पद्धतीने कमवा पैसे
तुम्ही इन्स्टाग्राम या प्लॅटफॉर्मचा योग्यरित्या वापर असाल तुम्हाला या माध्यमातून पैसे कमावणे सोपे होऊन जाईल. त्यासाठी आपल्याला खालील पद्धतीचा वापर करावा लागेल. 


अॅफिलिएट लिंक्स (Affiliate Links)


इंस्टाग्रामवर तुम्ही अॅफिलिएट लिंक्स (Affiliate Links)द्वारेही पैसे कमवू शकता. यामध्ये, तुमच्या या लिंकवरून किती लोकांनी वस्तू खरेदी केली यावर तुमची कमाई ठरते. या प्लॅटफॉर्मवर तुम्ही तुमचा ऑनलाइन व्यवसायही (Online Business) सुरू करू शकता. तुम्ही तुमचे उत्पादन येथे हायलाइट करून ग्राहक जोडू शकता.


सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर (Social Media Influencer)


सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बनून तुम्ही पैसे कमवू शकता. यामध्ये तुम्हाला एखाद्या उत्पादनाची जाहिरात करावी लागेल. यासाठी इंस्टाग्रामवर तुमचे किमान 5000 फॉलोअर्स असणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त, आपल्या रिल्स (reels)आणि सृर्जनशीलता (creativity)चांगली असावी. आता प्रश्न असा आहे की तुम्हाला अॅडसाठी उत्पादन कोठून मिळेल. येथे हे समजून घ्यावे लागेल की जास्त फॉलोअर्स नसल्यामुळे, तुम्हाला अशा ब्रँडशी संपर्क साधावा लागेल.


ऑनलाइन व्यवसाय (Online Business)


या प्लॅटफॉर्मवर तुम्ही तुमचा ऑनलाइन व्यवसायही सुरू करू शकता. तुम्ही तुमचे उत्पादन येथे हायलाइट करून ग्राहकांशी जोडू शकता. किंवा थर्ड पार्टी करार (3rd party contract) करुन वस्तू विक्री करु शकता.


तुम्‍ही तुमच्‍याकडे असलेल्या साहित्याची विक्री करून पैसे कसे कमवू शकता. अॅफिलिएट लिंक्स आणि इन्फ्लुएन्सर्स व्यतिरिक्त इतर कोणत्याही उत्‍पादनांची माहिती शेअर करू शकता. तुम्ही कोणत्याही विषयावर माहिती देऊ शकता. येथे तुम्ही प्रीमियम माहिती भरून 100 डॉलर्सपर्यंत पैसे कमऊ शकता.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha