Instagram Down : मेटा (Meta) कंपनीची मालकी असलेलं सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामची (Instagram) सेवा काही काळ डाऊन झाली होती. जगभरात अनेक देशांमध्ये गुरुवारी रात्री इंस्टाग्राम डाऊन  (Instagram Down) झालं होतं. जगभरात सुमारे 24 हजार युजर्सने यासंदर्भात कंपनीकडे तक्रार देत इंस्टाग्राम डाऊन झाल्याचं सांगितलं होतं. युरोपमध्ये सर्वाधिक युजर्सकडून इंस्टाग्राम डाऊन असल्याच्या तक्रारी मिळाल्या. तर भारतामध्येही अनेक युजर्सना या समस्येचा सामना करावा लागला. इंस्टाग्रामचा सर्व्हर डाऊन झाल्यानं युजर्सनी दुसऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. त्यामुळे ट्विटवर #instagramdown ट्रेंडिंग होतं. इंस्टाग्रामनं अधिकृत अकाऊंटवरून यासंदर्भात माहिती दिली होती.


सुमारे अर्धा तास डाऊन होतं इंस्टाग्राम


डाउनडेक्टरच्या (Downdetector) माहितीनुसार, गुरुवारी रात्री इंस्टाग्राम डाऊन झालं होतं. डाउनडेक्टर (Downdetector) एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे जिथे युजर्सना वेगवेगळ्या वेबसाइट्स आणि त्यांच्या सेवांबद्दल माहिती मिळते. इंस्टाग्राम आउटेजमध्ये 66 टक्के युजर्सचं अॅप क्रॅश झाल्याची नोंद होती, तर 24 टक्के लोकांना सर्व्हर कनेक्शनमध्ये अडचण येत होती. तर इतर 10 टक्के युजर्सला लॉग इन करण्यात अडचणी येत होत्या. काही युजर्सना इंस्टाग्रामवर फीड लोड होतं नव्हतं, मेसेज पाठवता येत नव्हते, स्टोरी किंवा फोटो पोस्ट करता येत नव्हते. 






 


ट्विटरवर मीम्सचा पाऊस


इंस्टाग्राम डाऊन झाल्यानंतर युजर्सनी इतर सोशल मीडिया साईटवर आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. ट्विटरवर मीम्सचा पाऊस पाहायला मिळाला, तर #instagramdown हे ट्रेंड करत होतं. ट्विटवर युजर्सनी भन्नाट मीम्स व्हायरल केल्या.










 






 


इंस्टाग्रामची सेवा पूर्ववत


जगभरात इंस्टाग्राम डाऊन झालं होतं. युरोपमध्ये याचा सर्वाधिक फटका बसला. भारतातही लोकांना इंस्टाग्राम लोड करताना त्रास झाला. मात्र, यामागचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. इंस्टाग्रामची मालकी असलेल्या META कंपनीने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र, लवकरच इंस्टाग्रामची सेवा पूर्ववत करण्यात आली.