13 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा, इनफोकसचा नवा स्मार्टफोन लाँच
एबीपी माझा वेब टीम | 26 Jul 2016 02:49 AM (IST)
मुंबई: इनफोकस कंपनीनं आपला नवा अँड्रॉईड स्मार्टफोन M535+ लाँच केला आहे. या स्मार्टफोनची किंमत 11,999 रु. आहे. या स्मार्टफोनची खासियत म्हणजे याचा दमदार सेल्फी कॅमेरा. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा दिला आहे. M535+ या स्मार्टफोनमध्ये इतरही अनेक फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये 5.5 इंच डिस्प्ले आहे. तर याचं रेझ्युलेशन 1080x1920 आहे. प्रोसेसरचा विचार केल्यास यामध्ये 1.3 Ghz ऑक्टाकोअर मीडिया टेक प्रोसेसर आहे. तसेच यामध्ये 3 जीबी रॅम देण्यात आली असून इंटरनल स्टोरेज 16 जीबी आहे. तर 64 जीबीपर्यंत मेमरी वाढविता येणार आहे. हा स्मार्टफोन 6.0 मार्शमेलो सिस्टमवर आधारित आहे. यामध्ये 13 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. तसंच यामध्ये 4जी सपोर्ट आहे. याची बॅटरी 2600mAh आहे.