Infinix Zero 5G 2023 : मोबईल उत्पादक कंपनी Infinix ने आपला Zero 5G मोबाईल फोन या वर्षी लॉन्च केला होता. आता कंपनीने याचा अपग्रेड व्हर्जन Infinix Zero 5G 2023 देखील लॉन्च केला आहे. MediaTek Dimensity 1080 5G प्रोसेसर, होल-पंच कटआउट आणि IPS LCD स्क्रीन या फोनमध्ये उपलब्ध आहेत. भारतात अद्याप हा फोन लॉन्च करण्यात आलेले नाही. भारतात याची स्पर्धा Poco X4 Pro 5G शी होणार आहे. या दोन्ही स्मार्टफोनबद्दल माहिती जाणून घेऊ.
infinix zero 5g 2023 किंमत
सध्या भारतासह इतर काही बाजारपेठांसाठी या मोबाइलची किंमत आणि उपलब्धता याबद्दल माहिती देण्यात आलेली नाही. परंतु इतर देशांत जेथे हा फोन उपलब्ध आहे, तेथे याची किंमत 239 डॉलर्स इतकी (सुमारे 19,400 रुपये) आहे. हा स्मार्टफोन Android 12 वर आधारित XOS 12 सह सादर करण्यात आला आहे. ज्यामध्ये ड्युअल-सिम सपोर्ट आहे. याशिवाय या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप, ज्यामध्ये 50 मेगापिक्सल प्राइमरी आणि 2 मेगापिक्सलचे दोन सेन्सर दिले आहेत. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या मोबाईलमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. ज्यामध्ये ड्युअल फ्रंट फ्लॅश उपलब्ध आहे. या फोनचा मागील कॅमेरा 30fps वर 4K व्हिडीओ रेकॉर्डिंग क्षमतेसह येतो.
याशिवाय या मोबाइलमध्ये 6.78 इंच फुलएचडी + आयपीएस LTPS (1,080×2,460 पिक्सेल) डिस्प्ले, ज्याचा रिफ्रेश रेट 120 Hz आहे. MediaTek Dimensity 1080 5G प्रोसेसर आणि आर्म Mali-G68 MC4 GPU ग्राफिक्ससाठी उपलब्ध आहेत. तसेच फोनमध्ये 8 GB रॅम देण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये 256 GB ची इनबिल्ट स्टोरेज क्षमता देखील आहे. ज्याला 256 GB पर्यंत वाढवता येऊ शकते. या मोबाईलमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी Wi-Fi 6 A/B/G/N/AC/X, 5G, Bluetooth, GPS, OTG, FM रेडिओ, 3.5 mm हेडफोन जॅक आणि USB Type-C पोर्ट सारखी फीचर्स उपलब्ध आहेत. याशिवाय या हँडसेटमध्ये ई-कंपास, जायरोस्कोप, लाईट सेन्सर, जी-सेन्सर आणि प्रॉक्सिमिटी सेन्सरसह फिंगरप्रिंट सेन्सर सुरक्षिततेसाठी देण्यात आला आहे.
Poco X4 pro 5G
Infinix Zero 5G 2023 शी स्पर्धा करण्यासाठी Poco X4 Pro 5G आधीच बाजारात उपलब्ध आहे. या फोनमध्ये तुम्हाला 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज मिळेल. या मोबाईलची किंमत 15,999 रुपये आहे. हा फोन काही महिन्यांपूर्वी 18,999 रुपयांच्या किंमतीत लॉन्च करण्यात आला होता. याच्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या मोबाईलची किंमत 16,999 रुपये आहे आणि 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या मोबाईलची किंमत 18,999 रुपये आहे.