Infinix Hot 20 Launch : चीनची मोबाईल निर्माता कंपनी Infinix ने आपला नवीन 5G स्मार्टफोन Infinix Hot 20 5G भारतात लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन हाय रिफ्रेश रेट डिस्प्ले, मोठी बॅटरी आणि 5G बँड सपोर्टसह येते. यात ड्युअल कॅमेरे आणि बजेट रेंज चिपसेट आहे. कंपनीने या स्मार्टफोनची किंमत 15,000 रुपये इतकी ठेवली आहे. पुढील आठवड्यात हा फोन विक्रीसाठी उपलब्ध होपणार आहे. या रिफ्रेश रेटसह, सॅमसंग आणि वनप्लस स्मार्टफोन आधीपासूनच बाजारात उपलब्ध आहेत. चाल तर या नवीन स्मार्टफोनबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ. 


Infinix Hot 20 5G ची किंमत 


Infinix Hot 20 5G च्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 11,999 रुपये आहे. हा फोन ब्लास्टर ग्रीन, रेसिंग ब्लॅक आणि स्पेस ब्लू या 3 रंगांमध्ये बाजारात लॉन्च करण्यात आला आहे. कंपनीचा हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर 9 डिसेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल.


स्पेसिफिकेशन 


Inifnix Hot 20 5G फुल-एचडी+ रिझोल्यूशनसह 6.6-इंचाच्या ड्रॉप-नॉच डिस्प्लेसह येतो. यात 120Hz रिफ्रेश रेट आणि 180Hz टच सॅम्पलिंग रेटसह LCD पॅनेल आहे. फोनच्या स्क्रीनवर पांडा ग्लासचे प्रोटेक्शन आहे. यात फ्रंट कॅमेरा सेटअप आणि मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. याच्या मागील बाजूस 50MP मुख्य लेन्स आणि एक सहायक लेन्स आहे. सेल्फी घेण्यासाठी यात समोर 8MP सेन्सर देण्यात आला आहे. यामध्ये फ्रंट आणि रियर अशा दोन्ही कॅमेऱ्यांवर एलईडी फ्लॅश सपोर्ट उपलब्ध आहे.


हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 810 SoC द्वारे समर्थित आहे. हा फोन 4GB रॅम आणि 64GB अंतर्गत स्टोरेजसह येतो. डिव्हाइसमध्ये 1TB पर्यंत अतिरिक्त स्टोरेज आणि 3GB विस्तारित रॅम सपोर्ट देखील आहे. हँडसेटमध्ये 18W फास्ट चार्जिंग, 5,000mAh बॅटरी, DTS ऑडिओ सपोर्ट असलेले स्पीकर्स आणि हेडफोन कनेक्ट करण्यासाठी 3.5mm ऑडिओ जॅक देखील आहे. दरम्यान, Samsung Galaxy S21 Ultra हा कंपनीचा पहिला स्मार्टफोन आहे, जो 2K रिझोल्यूशनवर 120Hz रिफ्रेश रेटसाठी सपोर्टसह येतो. तसेच Mi 11 Ultra हा भारतात 120Hz डिस्प्लेसह नवीनतम फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे. Vivo X70 Pro Plus मध्ये ड्युअल कव्हर्ड  AMOLED डिस्प्ले आहे. ज्याचा 120Hz रिफ्रेश रेट आहे.