नोएडा: येत्या काही वर्षात तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात रोबोचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येईल. आगामी काळ हा रोबोटिक्सचा काळ असल्याचं सांगण्यात येतंय. अशावेळी देशात रोबोची निर्मिती करणे हे क्रांतीचे लक्षण असल्याचं सांगण्यात येतंय. भारतातही नोएडा या शहरात देशातील सर्वात मोठ्या रोबोट फॅक्टरीची सुरुवात करण्यात आली आहे. बुधवारी निती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी या रोबोट फॅक्टरीचे उद्धाटन केलं आहे.

Continues below advertisement

या कंपनीत तयार करण्यात येणारे रोबोट हे साहित्यावरील कोडचे स्कॅन करु शकते. त्या स्कॅनवरुन साहित्य कोणत्या पत्त्यावर पाठवायचं आहे ती माहिती देते. या रोबोटमध्ये अनेक कामं एकाच वेळी करण्याची क्षमता आहे. हा रोबोट 25 किलो ते 2 टनापर्यंतचे वजन एका ठिकाणावरुन दुसऱ्या ठिकाणी पोहोचवू शकतात. यासाठी या रोबोटमध्ये लिडार तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतोय.

चीनी मोबाईल कंपन्यांना टक्कर देण्यासाठी आता 'देशभक्तीचा तडका' देत मायक्रोमॅक्स सज्ज, लॉन्च केले Micromax In Note 1 आणि Micromax In 1b

Continues below advertisement

येत्या काही काळात देशात तंत्रज्ञानाचा वापर जास्तीत जास्त वापर करावा यासाठी निती आयोग प्रयत्नशील आहे. त्यामुळे या अशा प्रकारच्या वर्ल्ड क्लॉस फॅक्टरीच्या निर्मिती करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्यामुळे नोएडात देशातील सर्वात मोठी रोबोट तयार करणारी एडवर्ब नावाची कंपनी उभा राहत आहे.

नीती आयोगाचे अमिताभ कांत म्हणाले की, देशात जलद तंत्रज्ञानाच्या विकासाची आवश्यकता आहे. यामध्ये रोबोटिक्स आणि जीनोम सिक्वेन्सिंगची गरज आहे. त्यामुळे अशा कंपन्यांच्या विकासाला प्रोत्साहन देण्याची गरज आहे.

भारतात सध्या अनेक कंपन्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या कार्यक्रमांच्या अंतर्गत भारतात तंत्रज्ञानाच्या विकासासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे.

केंद्र सरकारची मोठी घोषणा, संरक्षण मंत्रालयाकडून 101 वस्तूंवर आयातबंदी, राजनाथ सिहांची माहिती