नवी दिल्ली : भारतीय रेल्वे हायस्पीड ट्रेन तंत्रज्ञानाबाबत जर्मनीबरोबर एक महत्वपूर्ण करार करणार आहे. देशांतर्गत प्रवासाला सध्या लागणारा वेळ घटवण्यासाठी हा करार अतिशय महत्वपूर्ण असेल.
उद्या म्हणजे 14 ऑक्टोबर रोजी जर्मनीच्या वाहतूक आणि डिजीटल इन्फ्रास्ट्रक्चर खात्याचे मंत्री अलेक्झांडर डॉब्रिंट यांच्याबरोबर हा करार होणार आहे. रेल्वे वाहतुकीच्या क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये परस्पर सामंजस्याचा करार होणार आहे.
यापूर्वी सुरेश प्रभू यांनी केलेल्या जर्मनी दौऱ्याचं फलीत म्हणून हा करार होत असल्याचं रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं.