विलिनीकरणाच्या चर्चेची बातमी बाहेर आल्याबरोबर आयडियाच्या शेअरमध्ये 27 टक्क्यांनी वाढ झालीय.
वोडाफोनकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, विलीनीकरणाचा प्रक्रिया शेअर्स अदलाबदलीच्या माध्यमातून होणार आहे. विलिनीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वोडाफोन ही एकच कंपनी मोबाईल सेवा पुरवणार आहे.
या दोन्ही कंपन्यांच्या विलीनीकरणानंतर वोडाफोनच्या भारतातील ग्राहकांची संख्या 39 कोटींच्या घरात पोहचेल. सध्या भारतातील टेलिकॉम क्षेत्रात वोडाफोन कंपनी दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर आयडिया सेल्युलर तिसऱ्या क्रमांकावर आहे. यामुळे या विलीकरणाच्या प्रक्रियेमुळे वोडाफोनही भारताच्या टेलिकॉम जगतात एक बलाढ्य कंपनी म्हणून उदयास येईल. याशिवाय या विलीनीकरणामुळे दोन्ही कंपन्यांचा एकत्मिरित मार्केट शेअर 43 टक्क्यांपर्यंत पोहोचेल. वोडाफोनच्या या वाढलेल्या मार्केट शेअरमुळे ते नव्यानेच या क्षेत्रात आलेल्या रिलायन्स जिओशी सामना करण्यासाठी सज्ज होतील.
ग्राहकांना फायदे
- विलीनीकरणानंतर वोडाफोनही टेलिकॉम जगतात बलाढ्य कंपनी म्हणून उदयास येईल.
- या विलीनीकरणानंतर वोडाफोनच्या भारतीय शेअर बाजारातील समावेश सोपा होईल.
- ग्लोबल ब्रोकरेज हाऊस सीएलएसएलच्या मते, या डीलमुळे 2019 पर्यंतच्या आर्थिक वर्षात वोडाफोनच्या उत्पन्नात 43 टक्क्यांनी वाढ होईल.
- तसंच ग्राहकांची संख्या 39 कोटींच्या घरात जाईल. जी रिलायन्स जिओ आणि एअरटेलच्या तुलनेत अधिक असेल.
- त्यामुळे रिलायन्स जिओच्या वाढीवर याचा परिणाम होणार आहे.
- रिलायन्सच्या फ्री ऑफरला आव्हान देण्यासाठी नवी कंपनी वेगवेगळ्या ऑफर लॉन्च करुन ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी सक्षम होईल.