मुंबई : जर तुम्ही ह्युंदाईची कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर झटपट निर्णय घ्या. कारण की, कंपनी नव्या वर्षापासून त्यांच्या कारच्या किंमतीत वाढ करणार आहे. कंपनीकडून तशी घोषणाही करण्यात आली आहे.
जानेवारी 2018 पासून ह्युंदाई कारच्या किंमतीत दोन टक्के वाढ होणार आहे. कंपनीच्या या निर्णयानंतर इयॉनपासून ट्यूसॉनपर्यंत सर्व कार महागणार आहे. त्यामुळे कारच्या किंमतीत 6,580 ते 50,380 रुपयांपर्यंत वाढ होणार आहे.
पण जर तुम्ही डिसेंबर महिन्यात कार खरेदी केल्यास तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो. सध्या उपलब्ध असलेला स्टॉकवर कंपनीनं बरीच सूटही दिली आहे.
सध्या ह्युंदाईच्या कारवर 40,000 रुपयांपासून तब्बल 70,000 रुपयांपर्यंत सूट देण्यात आली आहे.
बातमी सौजन्य : cardekho.com
नव्या वर्षापासून ह्युंदाईच्या कार महागणार!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Dec 2017 11:53 PM (IST)
जर तुम्ही ह्युंदाईची कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर झटपट निर्णय घ्या. कारण की, कंपनी नव्या वर्षापासून त्यांच्या कारच्या किंमतीत वाढ करणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -