नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने दसरा आणि मोहरमचं निमित्त साधत आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी खास प्लॅन लॉन्च केला आहे. या प्लॅननुसार प्रीपेड ग्राहकांसाठी खास टेरिफ व्हाऊचर (एसटीव्ही) देण्यात येणार असून, त्यावर दुप्पट डेटा मिळणार आहे.

बीएसएनएलने आपल्या पत्रकात म्हटलंय की, "देशात सणासुदीचं वातावरण आहे. हेच निमित्त साधत देशभरात एकूण चार डेटा एसटीव्ही प्लॅन लॉन्च केले आहेत. या डेटा प्लॅनची व्हॅलिडिटी 365 दिवस असून, त्यामध्ये 10 ते 31 ऑक्टोबर 2016 पर्यंत दुप्पट डेटा मिळेल."

बीएसएनएल कंपनी आपल्या ग्राहकांना अधिक विश्वासार्ह आणि स्वस्त सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहे, असा बीएसएनएलचे संचालक आर. के. मित्तल यांनी सांगितले.

बीएसएनएलचे डेटा प्लॅन :

  • 18 जीबी डेटा - 1 हजार 498 रुपये (याआधी केवळ 9 जीबी डेटा मिळत असे.)

  • 36 जीबी डेटा - 2 हजार 799 रुपये (याआधी केवळ 18 जीबी डेटा मिळत असे.)

  • 60 जीबी डेटा - 3 हजार 998 रुपये (याआधी केवळ 30 जीबी डेटा मिळत असे.)

  • 80 जीबी डेटा - 4 हजार 498 रुपये (याआधी केवळ 40 जीबी डेटा मिळत असे.)