नवी दिल्ली: हुवाईने आपला नवा स्मार्टफोन G9 प्लस प्रीमियम लाँच केला आहे. या स्मार्टफोनची किंमत 2399 युआन म्हणजे 24,900 रुपये असेल. या नव्या स्मार्टफोनचे दोन वेरिएंट 3 जीबी रॅम, 32जीबी मेमरी आणि 4 जीबी रॅम, 64 जीबी मेमरीसोबत उपलब्ध असेल. फोनमध्ये रिअर पॅनेलवर चालणारा फिंगरप्रिन्ट स्कॅनर देण्यात आला आहे.


 

G9 प्लसचा लूक अतिशय चांगला असून, यामध्ये 5.5 इंचाची 2.5D कर्व्ड ग्लास स्क्रिन आहे. ज्यामध्ये 1080 x1920 पिक्सेलचे रिझॉल्यूशन असेल. यामध्ये 2GHz क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 625 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आलेला आहे. या स्मार्टफोनचे दोन वॉरिएंट 3 जीबी रॅमसोबत असेल. दोन्हीमध्ये मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने 128 जीबीपर्यंत वाढवता येऊ शकतो.

 

फोटोग्राफीसाठी 16 मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा असून, त्यात OIS (ऑटो इमेज स्टेबलायझेशन) ड्यूअल टोन LED सोबत असेल. तर फ्रंट फेसिंग कॅमेरासाठी 8 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आलेला आहे.

 

कंपनीचा हा स्मार्टफोन 3340 mAh बॅटरीसोबत असेल. कनेक्टिव्हीटीसाठी यामध्ये 4G LTE, ब्लूटूथ, जीपीएस, वायफायसारखे ऑप्शन देण्यात आले आहेत. हा फोन लेटेस्ट अॅन्ड्रॉइड व्हर्जन 6.0 मार्शमॅलो पर कार्यरत असेल.