मुंबई : प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी HTC नं आपला U सीरिजचे स्मार्टफोन बाजारात आणले आहेत. या सीरिजमधील HTC U Ultra आणि U Play लॉन्च करण्यात आले आहेत. भारतात हे दोन्ही स्मार्टफोन 21 फेब्रुवारीपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत.
या स्मार्टफोनचं वैशिष्ट्य म्हणजे यात 4 जीबी रॅम देण्यात आली आहे. तसंच या स्मार्टफोनमध्ये 64 जीबी आणि 128 जीबी असे दोन व्हेरिएंटही देण्यात आले आहेत. सेकंडरी डिस्प्लेसोबतच या स्मार्टफोनमध्ये ऑटो फेस डिटेक्शन, ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनसारखे फीचर्सही देण्यात आले आहेत.
ड्युअल डिस्प्लेसोबत येणाऱ्या या स्मार्टफोनची बऱ्याच काळापासून टेकसॅव्हींना प्रतिक्षा होती.
HTC U स्मार्टफोनचे फीचर्स
ऑपरेटिंग सीस्टिम : अँड्रॉईड नॉगट 7.0
रॅम : 4 जीबी
प्रोसेसर : 2.15GHz क्वाड कोअर क्वालकॉम प्रोसेसर
डिस्प्ले : प्रायमरी 5.7 इंच तर सेकंडरी 2 इंच, एचडी रिझॉल्यूशन
कॅमेरा : 16 मेगापिक्सेलचा फ्रंट आणि रिअर कॅमेरा
मेमरी : 64 जीबी आणि 128 जीबी
बॅटरी : 3000mAh