मुंबई: व्हॉट्सअॅपचं ग्रुप व्हिडीओ कॉलिंगचं फीचर सुरु झालं आहे. गेल्या महिन्यात हे फीचर अॅन्ड्रॉईड आणि आयओएसच्या काही युजर्ससाठी उपलब्ध करण्यात आलं होत. मात्र आता हे फीचर व्हॉट्सअॅपच्या सर्व युजर्ससाठी उपलब्ध झालं आहे. व्हॉट्सअॅपच्या अॅन्युअल डेव्हलपर कॉन्फरन्सदरम्यान या फीचरबाबत माहिती देण्यात आली होती.
ग्रुप कॉलिगंचं हे नवं फीचर WhatsApp V.2.18.189 व्हर्जनवर उपलब्ध आहे. नवीन फीचर असल्याने अनेकांना हे फीचर हाताळताना थोडी अडचण होऊ शकते.
व्हॉट्सअॅपर ग्रुप व्हिडीओ कॉलिंग कसं करायचं?
1. सर्वात आधी ज्यांना व्हिडीओ कॉल करायचं आहे, त्या युजरचं चॅट ओपन करा. 2. चॅट ओपन केल्यानंतर व्हिडीओ कॉलिंग बटनावर क्लिक करा. 3. त्यानंतर व्हिडीओ कॉल करा आणि यूजर कॉल रिसिव्ह करेपर्यंत वाट पाहा. 4. एकदा पहिल्या युजरने कॉल रिसिव्ह केल्यानंतर तुम्ही इतर दोन युजर्सना कॉल करु शकता. 5. यासाठी तुम्हाला अॅड कॉन्टॅक्टवर क्लिक करावं लागणार आहे 6. नाव सर्च करून तुम्हाला कॉल करायचं आहे त्या युजरचं नाव अॅड करा 7. तिसऱ्या आणि चौथ्या युजरला जोडल्यानंतर त्याबाबतचं नोटिफिकेशन इतर दोन युजर्सना जाईल.