आता इंटरनेट कनेक्शन शिवायही गुगल मॅप वापरा
एबीपी माझा वेब टीम | 05 Jun 2016 04:24 AM (IST)
मुंबई : जर तुम्ही प्रवासात आहात आणि तुमचं नेट पॅक संपलं, आणि गुगल मॅप वापरताना प्रॉब्लेम येत असेल, तर टेन्शन घेऊ नका. अशावेळी गुगल मॅपचं ऑफलाईन अॅप डाऊनलोड करून त्याद्वारे तुम्ही तुमच्या इच्छीत स्थळी पोहचू शकता. मात्र, जर तुम्ही पायी किंवा सायकलिंग करून जात असाल तर तुम्हाला ऑफलाईन गुगल मॅप अॅप दिशा दाखवणार नाही. फक्त तुम्हाला तुमचे जवळचे ठिकाण दाखवू शकेल. हे डाऊनलोड करताना सुरूवातीला तुमच्या अॅन्ड्राईड मोबाईलवरील गुगल मॅपवर ऑफलाईन गुगल मॅप ऑन करा. त्यातून तुम्ही जिथे जाणार आहात त्या शहराचा मॅप ओपन करा. त्यानंतर तुम्हाला तुमचा ऑफलाईन गुगल मॅप तुमची दिशा दाखवेल, त्यानंतर तुमचे अॅप डाऊनलोड करण्यासंदर्भात विचारेल. त्याला डाऊनलोड करा म्हणजे तुम्ही तुमच्या इच्छीत स्थळी पोहचू शकता.