जिओच्या प्लॅनमध्ये एका दिवसासाठी 1GB डेटाची मर्यादा आहे. त्यानंतर इंटरनेटचा वेग मंदावतो. ग्राहकांना 128kbps या स्पीडने इंटरनेट वापरता येतं. मात्र ग्राहकांना अनेकदा जास्त आणि हायस्पीड डेटाची गरज पडते. पण मर्यादा संपल्यामुळे मोठी अडचण होते.
जिओने ग्राहकांची हीच गरज लक्षात घेऊन बूस्टर प्लॅन आणले आहेत. या प्लॅनमुळे ग्राहक रोजची डेटा मर्यादा संपल्यानंतरही हायस्पीड डेटाचा वापर करु शकतात.
जिओचा बूस्टर प्लॅन कसा निवडाल?
बूस्टर प्लॅन निवडण्यासाठी तुम्हाला माय जिओ अॅपमध्ये जाऊन पर्याय निवडावा लागेल. माय जिओ अॅपमध्ये गेल्यानंतर रिचार्ज सेक्शनमध्ये जावं, त्यामध्ये बूस्टर पॅकचा पर्याय दिसेल. यामध्ये तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे प्लॅन निवडू शकता.
तुमच्या आवडीचा प्लॅन निवडल्यानंतर तुम्ही ऑनलाईन पेमेंट करु शकता. ऑनलाईन पेमेंट करताच तुमचा बूस्टर पॅक सुरु होईल.
- 11 रुपयांचा बूस्टर पॅक : यामध्ये 100MB डेटा मिळेल
- 51 रुपयांचा बूस्टर पॅक : यामध्ये 1GB डेटा मिळेल
- 91 रुपयांचा बूस्टर पॅक : यामध्ये 2GB डेटा मिळेल
- 201 रुपयांचा बूस्टर पॅक : यामध्ये 5GB डेटा मिळेल
- 301 रुपयांचा बूस्टर पॅक : यामध्ये 10GB डेटा मिळेल. 10GB ही बूस्टर पॅकची कमाल मर्यादा आहे.