मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदी जाहीर केल्यानंतर देशात चलनकल्लोळ सुरु झाला. पंतप्रधानांनी 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून बाद करत कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यासाठी प्रयत्न सुरु केले.


कॅशलेस व्यवहार सुलभतेनं करता यावेत, यासाठी डिजिटल व्यवहारांवरील निर्बंध सरकारनं उठवले. कॅशलेस व्यवहारांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या स्वाईप मशिन्सची मागणी नोटाबंदीमुळे वाढली आहे.

स्वाईप मशिनसाठी बँकांकडून 150 ते 300 प्रतिमहिना रक्कम आकारली जाते.

तसंच वार्षिक सेवा शुल्कही घेतलं जातं.

कसे मिळवाल कार्ड स्वाईप मशिन?

  • स्वाईप मशिन मिळवण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी बँकेत करंट अकाऊंट म्हणजेच चालू खातं काढावं लागेल

  • टिन क्रमांक म्हणजेच टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर चालू खात्याला जोडावा लागेल

  • जर तुमचं बँकेत बचत खातं असल्यास तुमचा पॅन कार्ड नंबर आणि कॅन्सल्ड चेक द्यावा लागेल

  • त्यानंतर स्वाईप सेवा देणाऱ्या प्रोव्हायडरकडून स्वाईप मशिन घेऊन तुम्हाला तुमच्या चालू खात्याला जोडता येईल

  • यानंतर तुम्हाला तुमच्या ग्राहकांना स्वाईप मशिनच्या माध्यमातून व्यवहार करण्याची सोय करता येईल


 

कार्ड स्वाईप सेवा देणारे प्रोव्हायडर

  • पेयू मनी PayUMoney

  • पाईन लॅब्स Pine Labs

  • जीओ मनी Jio Money

  • एम स्वाईप M Swipe

  • तसंच विविध बँकांकडूनही ही सेवा देण्यात येते


 

किती दिवसात मिळेल स्वाईप मशिन?

  • नोटाबंदीपूर्वी स्वाईप मशिन 20 दिवसांत मिळत होतं.

  • नोटाबंदीनंतर साधारणपणे दोन महिन्यात स्वाईप मशिन मिळतं.

  • दरवर्षी 5000 मशिन्सची मागणी नोटाबंदीपूर्वी होती.

  • नोटाबंदीनंतर महिन्याला 10000 मशिन्सची मागणी करण्यात येत आहे.