मुंबई : रिलायन्स जिओने ग्राहकांना खास भेट दिली. जिओ युझर्सच्या प्राईम मेंबरशीपची मुदत पुढच्या एक वर्षासाठी वाढवण्यात आली आहे. मात्र प्राईम मेंबरशीप आपोआप अपग्रेड होणार नाही. ग्राहकांना प्राईम मेंबरशीपचा यापुढेही लाभ घ्यायचा असेल, तर ती अपग्रेड करावी लागणार आहे.
प्राईम मेंबरशीप कशी मिळवाल?
तुमच्या मोबाईलमध्ये MyJio हे अॅप नसेल, तर ते गुगल प्ले स्टोअरमध्ये जाऊन डाऊनलोड करा
अॅप ओपन करताच सर्वात टॉपला एका बॅनरवर प्राईम मेंबरशीपसंबंधित ‘गेट नाऊ’ असा एक ऑप्शन दिसेल.
त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर प्राईम मेंबरशीप ऑफर रिन्यू करता येईल.
तुम्ही ज्या नंबरवरुन नोंदणी केलेली असेल, त्या नंबरला पुढचं एक वर्ष ही मेंबरशीप मोफत मिळेल.
MyJio अॅपमध्ये गेट नाऊ ऑप्शनचं बॅनर दिसत नसेल, तर लॉग आऊट करुन पुन्हा एकदा लॉग इन करा, तुम्हाला बॅनर दिसेल.
जिओ प्राईम मेंबरशीपचे फायदे
जिओ प्राईम मेंबर्सना स्वस्त आणि स्पेशल टॅरिफ प्लॅन मिळतात
VoLTE सर्व्हिसमुळे मोफत अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा
जिओ अॅपचा लाभ
हे सर्व लाभ पुढच्या वर्षी म्हणजे 31 मार्च 2019 पर्यंत मिळणार
जिओची प्राईम मेंबरशीप घेण्यासाठी 99 रुपये मोजावे लागत होते. या ऑफरची मुदत 31 मार्चला संपत होती. मात्र जिओने या ऑफरची मुदत वाढवत 31 मार्च 2019 केली आहे. तर जिओचे नवे युझर्स 99 रुपयांमध्ये प्राईम मेंबरशीप घेऊ शकतात.
31 मार्च 2018 रोजी जिओची प्राईम मेंबरशीप संपणार होती. त्यामुळे पुढे काय, असा प्रश्न प्रत्येक युझर्सच्या मनात होता. अखेर जिओने एक दिवस अगोदरच बोनांझा ऑफर देण्याची घोषणा केली.