Twitter Verified Crime : आजकाल लोकं कसं आणि कुणाला फसवतील याचा नेम नाही. वेगवेगळी पद्धतीची अमिषं दाखवून फसवणुकीचे अनेक प्रकार रोज समोर येत असतात. असाच फसवणुकीचा एक प्रकार आता मुंबईत समोर आला आहे. सोशल मीडिया अकाऊंट व्हेरिफाईड करुन देतो? असं जर कुणी तुम्हाला म्हणत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. याचं कारण आहे मुंबईमध्ये एका प्रसिद्ध वकिलाला अकाऊंट व्हेरिफाईड करण्याच्या नावाखाली फसवल्याचा प्रकार उघड झाला आहे.

  


या व्यक्ति, संस्थांचं अकाऊंट होऊ शकतं व्हेरिफाईड


ट्विटरवर व्हेरिफाईड होण्यासाठी सहा प्रकार ट्विटरनं 'नोटेबल' व्यक्ती आणि संस्था म्हणून दिले आहेत. या प्रोफाईल्समध्ये प्रोफाईलचं नाव,  इमेज, ई-मेल अॅड्रेस/मोबाइल नंबर देणं आवश्यक आहे. याशिवाय हे ट्विटर अकाऊंट कमीत कमी सहा महिन्यांपासून सक्रिय असावं.  


हे लोक, संस्था करु शकतात अप्लाय


सरकार 


न्यूज एजन्सी, न्यूज समूह, पत्रकार  


कंपनी, ब्रँड आणि संघटना 


मनोरंजन


स्पोर्ट्स आणि गेमिंग


अॅक्टिव्हिस्ट, ऑर्गनायझर्स 


सामग्री क्रिएटर्स आणि अन्य प्रभावशाली व्यक्ती


या प्रकारातील नोटेबल व्यक्ती आणि संस्था व्हेरिफिकेशनसाठी रिक्वेष्ट करु शकतात. 


ट्विटर व्हेरिफाईड म्हणजे काय आणि ते कसं करावं? (What is Twitter Verified and how to do it?)

ट्विटर व्हेरिफिकेशनद्वारे एखाद्या व्यक्तिला व्हेरिफाईड केले जाते. व्हेरिफाईड झाल्यानंतर त्या व्यक्तिच्या अकाऊटच्या नावासमोर ब्लू टिक येते. यामुळं ओरिजिनल अकाऊंट ओळखण्यास मदत होते. ट्विटरनं विविध क्षेत्रातील 'नोटेबल' व्यक्तिंसाठी ही सुविधा आणलीय. व्हेरिफाईड करण्यासाठी ट्विटरवर Request Verification असा ऑप्शन अकाऊंट सेटिंग्समध्ये असतो. यावर जाऊन आपण ज्या प्रकारामध्ये येतो. त्यातून आपण अकाऊंट व्हेरिफिकेशनसाठी विनंती ट्विटरकडे करु शकता. यानंतर ट्विटर आपल्या अकाऊंटचा अभ्यास करुन आपलं अकाऊंट व्हेरिफाईड करायचं की नाही हे ठरवतं. यासंदर्भात आपल्याला मेल देखील ट्विटरकडून येतात. यासाठी कुठल्याही प्रकारची फी किंवा पैसे लागत नाहीत. त्यामुळं आपल्याला जरी कुणी अशी आमिष दाखवत असेल की पैसे देऊन अकाऊंट व्हेरिफाईड करुन देऊ तर त्यावर विश्वास ठेवू नका. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha