नवी दिल्ली : ऑनर व्ह्यू 10 लाँच केल्यानंतर हुआवेची सब ब्रँड ऑनर भारतात लवकरच नवा स्मार्टफोन लाँच करणार आहे. 17 जानेवारी रोजी ऑनर 9 लाईट हा फोन भारतात येणार असून तो फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध असेल. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये हा फोन चीनमध्ये लाँच करण्यात आला होता. चार कॅमेरे हे या फोनचं वैशिष्ट्य असेल.

ऑनर 9 लाईट या फोनमध्ये 5.6 इंच आकाराची स्क्रीन देण्यात आली आहे, जी आयपीएस डिस्प्लेसोबत असेल. या स्मार्टफोनमध्ये किरिन 659 प्रोसेसर देण्यात आलं आहे. तर 3GB आणि 4GB रॅम व्हेरिएंट असेल. यामध्ये 32GB आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंटचा पर्याय असेल.

या फोनमध्ये चार कॅमेरे आहेत, म्हणजेच रिअर आणि फ्रंट ड्युअल कॅमेरा असेल. रिअर आणि फ्रंट दोन्हीही कॅमेराची प्रायमरी लेंस 13 मेगापिक्सेल आणि सेकेंडरी कॅमेरा लेंस 2 मेगापिक्सेल दिलेली आहे.

या फोनच्या 3GB रॅम + 32GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 1199 युआन म्हणजे जवळपास 11 हजार 667 रुपये, तर 4GB रॅम + 64GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 1799 युआन म्हणजे जवळपास 17 हजार 506 रुपये ठेवण्यात आली आहे. त्यामुळे भारतातही या फोनची किंमत 20 हजार रुपयांच्या आसपास असण्याची शक्यता आहे.

ऑनर 9 लाईटचे फीचर्स

  • अँड्रॉईड ओरियो 8.0

  • 5.6 इंच आकाराची स्क्रीन

  • ड्युअल रिअर आणि ड्युअल फ्रंट कॅमेरा

  • रिअर आणि फ्रंट दोन्हीही कॅमेराची प्रायमरी लेंस 13 मेगापिक्सेल आणि सेकेंडरी कॅमेरा लेंस 2 मेगापिक्सेल.

  • किरिन 659 प्रोसेसर

  • 3GB आणि 4GB रॅम व्हेरिएंट

  • 32GB आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंटचा पर्याय

  • 3000mAh क्षमतेची बॅटरी