मुंबई : होंडाने डब्ल्यूआर-व्हीचे प्रॉडक्शन व्हर्जनची टीझर इमेज रिलीज करण्यात आली आहे. ही कार कंपनीची पहिली कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे. 8 नोव्हेंबरला साओ पाउलो इंटरनॅशनल मोटर शोमध्ये ही कार पहिल्यादा दाखवली जाणार आहे.
डब्लूआर-व्ही सर्वात आधी ब्राझीलमध्ये लॉन्च केली जाणार आहे. भारतात 2017 च्या पहिल्या तीन महिन्यात लॉन्च केली जाण्याची शक्यता आहे. या कारची स्पर्धा मारुतीच्या सुझुकी व्हिटारा ब्रेझा आणि फोर्डच्या इकोस्पोर्टशी असणार आहे.
या कारची डिझाईन बॉक्सी आणि जबरदस्त आहे. बाजूने होंडा जॅजसारखी दिसते. तर पुढील आणि मागील बाजूची डिझाईन नव्याने केली आहे. ग्रिलच्या दोन्ही बाजूंना स्वेफ्ट-बॅक हेडलॅम्प्स देण्यात आले आहेत.
पॉवर स्पेसिफिकेशनबाबत अधिक माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. मात्र, 1.2 लीटर आय-व्हीटेक पेट्रोल आणि 1.5 लीटर आय-डीटेक डिझेल इंजिनमध्ये होंडा ही कार बाजारात आणू शकते, अशी चर्चा आहे.